अहमदनगर दि.१५ जुलै
सावेडी उपनगर मधील एकविरा चौकात तुफान मारहाणीत अंकुश चात्तर गंभीर जखमी झाले आहेत. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असून तीन जणांनी अंकुश चत्तार यांच्यावर वार केले आहेत या घटनेत अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर मॅक केअर हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. मात्र ही मारामारी कशामुळे झाली अद्याप कळले नाही तोफखाना पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.