अहमदनगर दि.१९ डिसेंबर
गुटख्या मुळे तोंडाचा कर्क रोग होऊन हजारो लोकांना यामुळे मृत्यू येतो अनेकांना यामुळे तोंडाचे ऑपरेशन करावे लागत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.गुटखा खाऊन कॅन्सर झाल्यामुळे मृत्यू होऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत तरीही हा गुटखा अजूनही नगर शहरात येतच आहे.
अहमदनगर शहरात शनिवारी दिल्लीगेट परिसरात दोन मालवाहू टेम्पो मधून सुमारे दहा लाख रुपयांचा अवैद्य विक्रीसाठी आणलेला गुटखा पोलिसांनी पकडला ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाच्या एका कर्मचाऱ्याने आणि नगर शहर उपअधीक्षक अनिल कातकडे आणि त्यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून गुटखा पकडला.
एवढा मोठ्या प्रमाणात नगर शहरात गुटखा येतो कुठून आणि या मागचा मोहरक्या कोण आहे ? याबाबत आता पोलिसांनी सखोल तपास करणे गरजेचे आहे. कारण जर दहा लाख रुपयांचा गुटखा नगर शहरातील मध्यवस्तीत आणला गेला असेल तर यापेक्षा अधिक गुटखा नगर शहरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे हा गुटखा नगर शहरातील माळीवाडा भागात जाणार होता मात्र त्या ठिकाणी सुरू असलेल्या रोडच्या कामामुळे हा गुटखा दिल्लीगेट परिसरात ठेवण्यात आला होता मात्र हा गुटखा इथे येण्याची पहिली वेळ नाही याआधीही अनेक वेळा या ठिकाणी देवाणघेवाण होत असल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे माळीवाडा भागातील अवैध गुटख्याचे मोठे गोडाऊन असल्याची माहिती मिळतीय.
हा छापा पडल्यानंतर अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला.मात्र या गुन्ह्याचा तपास कोणाकडे द्यायचा याच्यात मात्र काही मिनिटात मोठे फेरबदल केले गेले सुरुवातीला स्थानिक गुन्हे शाखे कडे देण्याचा निर्णय झाला होता त्यासाठी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे एक अधिकारी आणि कर्मचारी दाखले झाले होते.मात्र अचानकपणे कोतवाली पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला त्यामुळे नेमका यामागे वरिष्ठांचा काय हेतू असावा हे समजायला तयार नाही. एलसीबी व्हाया कोतवाली पोलीस स्टेशन कडे हा तपास गेला असला तरी पोलिसांनी हा तपास करून या प्रकरणातील शेवटच्या घटका पर्यंत जाणे गरजेचे आहे.
कारण आज पर्यंतच्या गुटका प्रकरणात पडलेल्या छाप्या मध्ये शेवटपर्यंत कोणीच पोहोचले नाही ही वस्तुस्थिती आहे. ड्रायव्हर किंवा छोट्या मोठ्या लोकांवर कारवाई होते मात्र मेन मोहरक्यापर्यंत पोलीस पोहोचत का नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या गुटख्यामागे नेमका मास्टरमाईंड कोण याचा तपास आता पोलिसांनी केला पाहिजे.