HomeUncategorizedपत्नी विषयी अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून खून करणाऱ्या आरोपीस घटने नंतर...

पत्नी विषयी अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून खून करणाऱ्या आरोपीस घटने नंतर चोवीस तासाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

advertisement

अहमदनगर दि.१० जून

श्रीरामपूर शहरात राहणाऱ्या सुनील देवकर ज्याच्या पत्नी विषयी तन्वीर शहा यांनी अपशब्द वापरले होते ज्याचा राग मनात धरून सुनील देवकर याने तन्वीर शहा याचा खून केला होता. ही घटना शुक्रवारी घडल्यानंतर श्रीरामपूर शहरात एकच खळबळ उडाली होती.

अहमदनगर जिल्ह्यात सध्या दोन समाजांमध्ये व्हाट्सअप स्टेटस वरून बरेच वाद निर्माण झाले आहेत त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून तपास सुरू केला होता. खून झालेला मयत तनवीर शहा याचा भाऊ साजीद छोटु शहा याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात या घटनेविषयी फिर्याद नोंद केली होती त्यानुसार सुनील देवकर यांच्यासह एका अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.श्रीरामपूर शहर पोलिसांसह अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील आरोपींचा तपास सुरू केला होता.

सुनील देवकर हा रेल्वे मार्गाने कुठेतरी पळून जाणार असल्याची माहिती तपास करत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच त्या पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात वेषांतर करून सापळा लावला होता सुनील देवकर रेल्वे पळून जाण्यासाठी रेल्वे स्थानकात येतात वेषांतर करून थांबलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून पकडले घटनेच्या चोवीस तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई / तुषार धाकराव, सफौ / भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/विजयकुमार वेठेकर, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना / रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, बाळासाहेब गुंजाळ, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोकॉ/ रणजीत जाधव, किशोर शिरसाठ, गणेश भिंगारदे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ/बबन बेरड आदींनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular