Homeशहरदाळमंडाई परिसरातील भारत सरकार मित्र मंडळाचा गणपती पारंपारिक जागेवरच प्रतिष्ठापना करणार -...

दाळमंडाई परिसरातील भारत सरकार मित्र मंडळाचा गणपती पारंपारिक जागेवरच प्रतिष्ठापना करणार – कल्पेश कुमार तिवारी

advertisement

अहमदनगर दि.१७ सप्टेंबर

अहमदनगर शहरातील दाळ मंडई येथील भारत सहकार मित्र मंडळाच्या गणपती स्थापनेचा वाद पोलिसांपर्यंत गेला असून भारत सहकार मित्र मंडळाला महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासन आणि एमएसईबी या सर्व सरकारी कार्यालयांनी परवानगी दिली असताना अचानकपणे या मंडळाच्या जागी दुसऱ्या मंडळांने गणपती बसवणार असल्याची परवानगी प्रशासनाकडे मागितल्यानंतर हा वाद चांगलाच पेटला होता मात्र हा वाद पोलीस दरबारी मिटला असल्याचं प्राथमिक माहिती मिळत असून दोन्ही मंडळांकडून काहीही अनुचित प्रकार घडणार नाही अशा प्रकारचे लेखी पत्र पोलीस प्रशासनाने घेतले आहे.

मात्र भारत सहकार मित्र मंडळाला सर्व प्रशासकीय परवानग्या मिळाल्या असल्याने भारत सहकार मित्र मंडळ आपल्या पारंपारिक जागेवर गणपती प्रतिष्ठापना करणार असल्याची माहिती या मंडळाचे अध्यक्ष कल्पेश कुमार लीलाधर तिवारी यांनी दिली आहे. मात्र प्रतिस्पर्धी गणपती मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी गणपती उत्सवाबरोबरच दहीहंडी किंवा इतर काही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही असे लेखी पोलीस प्रशासनाने दोन्ही मंडळाकडून लिहून घेतले असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे मात्र या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम नेहमीप्रमाणे होणार असून यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी भारत सहकार मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते घेणार असल्याची माहिती ही तिवारी यांनी दिली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता यावर्षीच्या गणपती उत्सवाला सर्वांनी सहकार्य करून हा गणपती उत्सव आनंदाने साजरा करावा असं आवाहनही कल्पेशकुमार तिवारी यांनी केल आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular