Homeक्राईमकोयते, कुऱ्हाडी, मिरचीची पूड घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली दहा जणांची टोळी...

कोयते, कुऱ्हाडी, मिरचीची पूड घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली दहा जणांची टोळी एमआयडीसी पोलिसांनी केली जेरबंद

advertisement

अहिल्यानगर दिनांक 18 मार्च

एमआयडीसी पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दहा जणांच्या टोळीला पकडले असून या टोळीकडून तीन लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवारी 17 मार्च रोजी साडेदहाच्या सुमारास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार नगर मनमाड महामार्गावरील वेळ परिसरातील चौधरी हॉटेल समोर अंधारामध्ये काही तरुण मोटरसायकल घेऊन हत्यारांसह थांबलेली आहेत अशी माहिती मिळाली होती.ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक
माणिक चौधरी यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह
मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता विळद घाट परिसरातील तळ्याच्या कडेला काही मोटरसायकल उभ्या करुन रोडवरील पत्र्याचे दुकानाचे मागील बाजुस काही इसम दबा धरुन बसल्याचे पोलीसांना दिसले. पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यास सुरुवात करताच त्यांच्यातील दोन जण आंध्राचा फायदा घेऊन पळून जात असताना पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले व इतर आठ जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले संशयित इसम१) मयुर पोपट बोरुडे वय २४ वर्षे रा. आठरे पाटील स्कुल जवळ शेवाळे मळा अ.नगर २) संकेत विजय वारस्कर वय २४ वर्षे रा. सिद्धार्थ नगर अ.नगर ३) ऋतिक रमेश शिंदे वय २४ वर्षे रा. सिद्धार्थ नगर अ.नगर ४) संतोष राम घोडके वय २४ वर्ष रा. सिद्धार्थनगर अ.नगर ५) अनिल वसंत घोरपडे वय २६ वर्षे रा. भुतकरवाडी अ.नगर ६) अनिकेत अनिल गायकवाड रा. सिद्धार्थनगर अ.नगर ७) ऋषिकेश राजु पाटोळे वय २५ वर्षे रा. सिध्दार्थनगर अ.नगर ८) शिवम अनिल झेंडे वय २४ वर्षे रा. सिद्धार्थनगर अ.नगर ९) अजय राजेश गायकवाड वय २२ वर्षे रा. भुतकरवाडी अ.नगर १०) रोहित वाळु अटक वय २४ वर्षे रा. सिद्धार्थनगर अ.नगर असे असून त्यांच्याकडून लोखंडी कोयता, लोखंडी पाईप, लोखंडी कु-हाड, दोरी, मिरची पुड, लाकडी दांडके चार मोटारसायकली ९ मोबाईल असा एकुण ३,३५०००/- रुपयाचा मुददेमाल मिळुन आला असून हे सर्वजण कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले.


या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशला पोकों/किशोर सुभाष जाधव यांचे फिर्यादीवरुन भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) ३१० (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नामे आरोपी नामे मयुर पोपट बोरुडे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर एमआयडीसी आणि तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षकvप्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक वी. चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई मनोज मोंढे, पोसई देविदास भालेराव, पोहेकों राजु सुद्रिक, मिसाळ, पोहेकों आडबल, पोकों/किशोर जाधव, पोकों/नवनाथ दहिफळे, पोकों प्रशांत धुमाळ, चापोहेकों गिरवले यांचे पथकाने केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular