अहिल्यानगर दिनांक १८ मार्च
नगर शहरातील व्यापारी दीपक परदेशी गेल्या २४ फेब्रुवारी पासून घरातून बेपत्ता होते. याप्रकरणी परदेशी यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दीपक परदेशी हरवले असल्याचे तक्रार नोंदवली गेली होती. पोलीस गेल्या 22 दिवसांपासून दीपक परदेशी यांचा तपास करत होते मात्र पोलिसांच्या हाती कोणताच धागा दोरा मिळत नसल्याने पोलीस मोबाईल आणि सीसीटीव्ही च्या आधारे दीपक परदेशी यांचा शोध घेत असतानाच बोल्हेगाव येथील सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये दिपक परदेशी हे त्यांच्या मोटारसायकलवरुन घराच्या दिशेने जात होते त्यांच्या मागून येणाऱ्या निरीक्षण केल्यानंतर दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान नायरा पेट्रोल पंप येथील सी.सी.टी.व्ही फुटेजमध्ये पांढऱ्या रंगाची टाटा इंडीका कार परदेशी यांच्या पाठोपाठ जात असल्याचे दिसुन आले. परंतु त्याच रोडवरील पुढील एका घराचे सी.सी.टी.व्ही मध्ये पांढऱ्या रंगाची इंडीका कार दोन ते तीन मिनीटे उशीराने येत असल्याचे दिसून आली या इंडिका कारवर पोलिसांनी लक्ष केंद्रित करून त्या इंडिका कारची संपूर्ण माहिती जमा केल्यानंतर ही गाडी विळद गाव येथील किरण कोळपे वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवून किरण कोळपे आणि सागर मोरे या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांनीही खून केल्याची कबुली दिली तसेच दीपक परदेशी यांचा खून करून मृतदेह बायपास रोडवर सिमेंटच्या बंदिस्त नालीत टाकल्याची कबुली दिली.
या खून प्रकरणातील किरण बबन कोळपे हा बडतर्फ पोलीस असून या आधीही त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर सागर मोरे हा राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील रहिवासी आहे.
दीपक परदेशी यांचे विळद गावातील काही लोकांकडे उसने पैसे होते ते परत वसुली साठी दोन लोकांना परदेशी यांनी काम दिले होते.मात्र वसुली करणाऱ्यांच्या मनात काळे आले आणि त्यांनी थेट परदेशी यांनाच लुटण्याचा डाव केला आणि त्या दोघांनी मिळून 24 फेब्रुवारी रोजी पांढऱ्या इंडिका गाडीत घेऊन निंबाळक बायपास कडे निघाले आणि त्यांनी गाडीत बसल्यावर दोन आरोपींपैकी एकाने परदेशी यांना दहा कोटी रुपये मागितले. यावर परदेशी आणि त्या दोन आरोपींची झटपट झाली. परदेशी गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत असताना गाडीतील एकाने परदेशी यांच्या गळ्याला नायलॉन दोरीने आवळून ठेवल्याने त्यांचा त्यातच मृत्यू झाला. आरोपींनी त्यानंतर परदेशी यांचा मृतदेह महामार्ग लगत असलेल्या एका एका सिमेंट नाली मध्ये लपून ठेवून पळ काढला होता.
याप्रकरणी आता तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये
किरण बबन कोळपे (वय ३८, रा. विळद, ता.नगर) सागर गीताराम मोरे (रा.ब्राम्हणी, ता. राहुरी) या दोघांच्या विरोधात पोलिस उपनिरीक्षक अमोल गायधनी यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.