Home राजकारण विकासाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचार करत असताना त्यांनी त्यांच्या महापौर पदाच्या...

विकासाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचार करत असताना त्यांनी त्यांच्या महापौर पदाच्या काळातली एक तरी काम दाखवावे जे नगरकरांच्या आणि त्यांच्या कायम लक्षात राहणार आहे…

अहिल्यानगर दिनांक 8 नोव्हेंबर

महाविकास आघाडी मधील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी महापौर अभिषेक कळमकर हे विधानसभा निवडणुकीसाठी सध्या प्रचार करत आहेत. अनेक अडथळे पार करत त्यांनी अखेर उमेदवारीचे तिकीट मिळवले. मात्र तिकीट मिळाल्यानंतरही महाविकास आघाडीचा घटस पक्ष असलेल्या शिवसेनेतील काही नेत्यांची नाराजी आणि त्यानंतर त्यांची समजूत काढून अखेर आता कुठेतरी स्थिर झालेले उमेदवार प्रचार करण्यात आघाडीवर आहेत.

शहरातील जुना घिसापिटा असलेला ताबेमारीचा गुंडागिरीचा भयमुक्तीचा मुद्दा घेऊन ते या निवडणुकीत प्रचार करताना दिसतात त्याचप्रमाणे नगर शहरात विकास झाला नाही असेही ते सध्या प्रचार सभेत नागरिकांकडे मत मागायला जाताना सांगत असतात मात्र ते स्वतः नगर शहराचे माजी महापौर आहेत ते कसे महापौर कसे झाले हे सांगायची गरज नाही मात्र त्यांनी त्यांच्या महापौर पदाच्या काळात कोणते असे ठोस विकासाचे काम केले हे सांगायला सुद्धा आज त्यांच्याकडे एकही काम नाही त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर ते महायुतीच्या उमेदवाराला चॅलेंज करत आहेत मात्र स्वतःच्या पारड्यात किती विकास केला हे सांगायला ते विसरत आहेत.


मुद्दा हा आहे की लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका या सर्व निवडणुका एकाच मुद्द्यावर लढवल्या जातात तो म्हणजे भयमुक्त नगर, ताबेमारी गुंडागर्दी आणि विकास अनेक वर्षांपासून हेच मुद्दे नगरकरांच्या कानावर निवडणुकीच्या दरम्यान पडत असतात मग प्रश्न असा पडतो की अहमदनगर शहराचे पोलीस प्रशासन काय करते? पोलीस दबावात काम करत असतील असा आरोप विरोधी पक्ष करत असेल तर मग न्यायालयात दाद का मागितली जात नाही? अहमदनगर शहराचे जिल्हाधिकारी काय करतात गृहमंत्री काय करतात असा प्रश्न पडतोय कारण एकच मुद्दा अनेक वर्षांपासून चर्चिला जातोय तो म्हणजे दहशतमुक्त शहर नगर मग जर पोलीस केस नोंदवून घेत नसतील तर मग त्यासाठी न्याय मागण्यासाठी न्यायालय आहेत तेथेही कोणी जात नाही ! का तिथेही दहशतीचा मुद्दा अडवा येतो हा ही प्रश्न आता प्रामुख्याने उपस्थित होतेय.

नगरकरांना आता दहशतमुक्त ताबेमारी या घिस्यापिट्या डायलॉगवर किती दिवस येड्यात काढणार विकासाचा मुद्दा हा खऱ्या अर्थाने चर्चिला जायला पाहिजे नगर शहरातील बेरोजगारी त्याचबरोबर एमआयडीसीचा प्रश्न या प्रश्नावर न बोलता विरोधी पक्ष नेहमीच दहशतीच्या मुद्द्यावर बोलतात बोलणारे तेच मात्र ऐकणारे आता कंटाळून गेले आहेत.

खरंच तुम्हाला नगर शहरात बदल घडायचा असेल तर विकासाच्या मुद्द्यावर बोला बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोला किंवा नगर शहरातील एमआयडीसीच्या मुद्द्यावर बोला या मुद्द्यावर जास्त कोणी बोलत नाही निवडणूक आली की दहशतमुक्तीचा नारा दिला जातो मग ती दहशतमुक्ती पुढे कुठे जाती हे पाच वर्षे कोणाला समजत नाही त्यामुळे आता या डायलॉगला नगरकर कंटाळले आहेत. दोन्हीही उमेदवारांनी विकासाबाबत काय अजेंडा असेल हे समोरासमोर येऊन सांगणे गरजेचे आहे.नगर शहराच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर,नगर शहराच्या आयटी प्रश्नावर नगर शहराच्या औद्योगिक विकासाच्या प्रश्नावर उमेदवारांनी चर्चा करावी कार्यकर्त्यांनी याबाबत आपले मत मांडायला हवे मात्र असे न होता वेगळाच प्रचार या निवडणूक दिसून येत आहे. त्यामुळे आता या प्रचारालाही नगरकर कंटाळले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version