Home शहर नगरी पॅटर्न वेगळाच … धनंजय जाधव यांनी घेतलेल्या भूमिकेचे सकल मराठा समाजाच्या...

नगरी पॅटर्न वेगळाच … धनंजय जाधव यांनी घेतलेल्या भूमिकेचे सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत… छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन केला सत्कार.. ओबीसी मराठा एकत्र येऊन आरक्षणाचा लढा उभारणार

अहमदनगर दि. १९ ऑक्टोबर

एकीकडे राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये वादंग सुरू असतानाच अहमदनगर येथील भाजपचे शहर उपाध्यक्ष धनंजय जाधव यांनी स्वतःचे ओबीसी आरक्षण नाकारत सक्षम ओबीसींनी देखील आरक्षण नाकारून गरज असलेल्या ओबीसी आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणाची ज्याला गरज नाही त्यांच्या आरक्षण काढून मराठा समाजातील गरजू व्यक्तींना आरक्षण द्यावे अशी वेगळी मागणी भाजप शहर उपाध्यक्ष जाधव यांनी केली आहे.

या मागणीनंतर सर्व स्तरातून धनंजय जाधव यांच्या या कृतीचे स्वागत करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने धनंजय जाधव यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांच्या या निर्णयाबाबत स्वागत करण्यात आले. आज आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये चांगलेच वादंग पेटले असताना आणि अनेक राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावरून विविध समाजामध्ये वादंग निर्माण होत आहे. मात्र आता राजकीय नेत्यांची भूमिका काही असो मात्र प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावामध्ये सर्व समाज एकत्र राहत असल्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजातील सर्वच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन लवकरच अहमदनगर शहरात आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक आयोजित करणार असल्याचे धनंजय जाधव आणि सकल मराठा समाजाच्या झालेल्या चर्चेमध्ये ठरवण्यात आले आहे.

आरक्षण नेमकं कशाप्रकारे भेटणार आहे. कोणाच्या आरक्षणाला धक्का लागेल अथवा लागणार नाही तसेच या आरक्षणापासून कोणाचा किती फायदा होईल आणि कोणाचा किती तोटा होईल यावर ओबीसी आणि मराठा समाज तसेच इतर अठरापगड जातीच्या मान्यवरांना बोलवून घेण्यात येणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे.

एकीकडे राजकीय नेते आरक्षणावरून विविध विधाने करून टीकेचे धनी होत असताना धनंजय जाधव यांच्या सारख्या नेत्याने समाजामध्ये शांतता आणि एकोप्याची भावना निर्माण करण्यासाठी घेतलेला निर्णय खूपच कौतुकास्पद असल्याचे सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितलय.

आज राज्यामध्ये आरक्षणावरून जो वाद सुरू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री महसूल मंत्री यांना पत्र पाठवणार असल्याचे देखील जाधव यांनी म्हटले आहे. तसेच आरक्षणाच्या मागणी आणि आंदोलनामुळे जे विविध समाजात वातावरण बिघडत चालले आहे त्या साठी अहमदनगर शहरातील ओबीसी आणि इतर समाजातील पदाधिकाऱ्यांवर चर्चा करुन सर्वच समाजात एकोप्याची भावना कशी निर्माण होईल आणि आरक्षणाचा लढा कसा पुढे कसा नेता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचाही धनंजय जाधव यांनी सांगितलय.

कोणत्याही ऐतिहासिक निर्णयाची सुरुवात अहमदनगर शहरतून होत असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे धनंजय जाधव आणि मराठा समाजाने एकत्रित येत हा आरक्षणाचा लढा पुढे नेण्याचा नगरी पॅटर्न हा वेगळाच आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version