अहमदनगर दि. १९ ऑक्टोबर
आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण तसेच इतर अनेक समाजांचा आरक्षणाचा लढा सुरू सुरू आहे. या आरक्षणाच्या लढाईमुळे अनेक राजकीय नेत्यांची चांगलीच कुचंबणा झाली आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना विविध समाजाच्या रोशाला बळी पडावे लागत आहे. काही ठिकाणी राजकीय नेत्यांसह आमदार, खासदार आणि राजकीय लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी या गावातही आता सकल मराठा समाजाच्या वतीने फ्लेक्स लावून राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली असून जो पर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आजी-माजी आमदार, राजकीय पुढारी, यांना गावबंदी असेल सरसकट मराठ्यांना ओ.बी.सी. तून ५०% च्या आत आरक्षण द्यावे अशा आशयाचा भाला मोठा फ्लेक्स गावात लावण्यात आला असून यामुळे आता राजकीय नेत्यांना गावात जाणे मुश्किल होणार आहे.
आरक्षण मिळावे याकरता महाराष्ट्रातून सर्वच गावागावातून जागृती झाल्यामुळे अनेक वेळा राजकीय नेत्यांना गावकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागतेय.लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असल्यामुळे आता राजकीय नेत्यांना प्रचार करणे सुरू करावे लागणार आहे. मात्र ठीक ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनल्या मुळे राजकीय नेत्यांसमोर या प्रश्नातून मार्ग कसा काढावा आणि गावात जाऊन लोकांना मते कशी मागावी यासाठी आरक्षण प्रश्नावर काहीतरी योग्य तोडगा काढावा लागणार आहे. अन्यथा आरक्षण हे आगामी निवडणुकीत राजकीय नेत्यांची डोकेदुखी होऊ शकते.