Homeशहरअनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ॲड. धनंजय जाधव यांच्या वतीने खा. डॉ....

अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ॲड. धनंजय जाधव यांच्या वतीने खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत स्कूल बस सेवेचा शुभारंभ संपन्न  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी धनंजय जाधव यांनी सुरु केलेला स्कूल बसचा नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद – खा. सुजय विखे   

advertisement

अहमदनगर दि २४ नोव्हेंबर:
समाजामध्ये आपण काम करीत असताना समाजाचे काहीतरी आपले देणे लागते या भावनेतून ॲड. धनंजय जाधव यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडले आहे.  विकासाच्या कामाबरोबरच सामाजिक प्रश्न सोडविण्याचे काम करत असतात दिव्यांग व्यक्ती ही समाजामध्ये वावरत असताना त्यांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत असते, अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्कूलमध्ये जाण्यासाठी धडपड करत असतात, धनंजय जाधव यांनी दिव्यांग व्यक्तींना मदतीचा हात देत मोफत स्कूल बस सेवा सुरू केले आहे, साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून देखील गरजू रुग्णांना मदतीचा हात देत आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे माझ्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे तो कौतुकास्पद असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.      

 अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ॲड.धनंजय जाधव यांच्या वतीने खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत स्कूल बस सेवेचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी अजित माने, अमित घाडगे आदींसह दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. 
     ॲड. धनंजय जाधव म्हणाले की अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्याना स्कूलमध्ये जाताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते त्यांच्या भावना लक्षात घेऊन खासदार डॉ, सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत स्कूल बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मनाला समाधान मिळते चांगल्या कामासाठी सकारात्मक ऊर्जा व प्रेरणा मिळते असे ते म्हणाले,

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular