अहमदनगर दि.२४ नोव्हेंबर
सकल मराठा समाजाच्या वतीने अहमदनगर शहरातील दिल्ली गेट परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या फोटोला काळी शाई फासत आंदोलन करण्यात आलं
सुषमा अंधारे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत तुम्ही आर्थिक मागास असल्याचं बोलायचं आणि दुसरीकडे १०० जेसीबीने फुलांची उधळण करायची. आमच्याकडे काहीच नाही बोलायचं आणि सभेसाठी १५० एकर मोसंबीची बाग तोडायची, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती
त्यांच्या या टिकेचा निषेध व्यक्त करत अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने सुषमा अंधारे यांच्या फोटोला काळे फसण्यात आले शहराच्या दिल्लीगेट परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने फोटोला काळी शाई लावत आंदोलन करण्यात आले लोकांमध्ये जाऊन जरांगे पाटील यांनी तो आपलेपणा दाखवला आहे समाज जागृत केली आहे समाजाला एक वेगळी दिशा दाखवली आहे. त्यामुळे लोकं स्वखुशीने फुल उधळत आहेत मात्र तुम्हाला निवडणुकीत साडेतीनशे मतही मिळवता आले त्यामुळे तुमची लोकप्रियता काय आहे हे लक्षात येतं देवी देवतांना नाव घेऊन तुम्ही मोठे होण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तुमच्यासारख्या विकृत बाईला शिवसेनेतून हकल पट्टी बाहेर करावी अशी मागणी आम्ही पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे करत असल्याचे यावेळी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेय.
एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला सुषमा अंधारेच करायचं काय खाली डोकं वर पाय घोषणा देत मराठा कार्यकर्त्यांनी सुषमा अंधारे यांचा निषेध केल एक महिला म्हणून त्यांचा आदर सध्या आम्ही करत आहोत मात्र त्यांनी पातळी सोडली तर जसा तसे उत्तर दिले जाण्याचा इशाराही देण्यात आला.