Homeशहरकायद्याचे नियम पायदळी तुडवण्यात सरकारी अधिकारी कर्मचारी अग्रेसर..खाजगी वाहनांवर पोलीस,,डॉक्टर, वकील, महाराष्ट्र...

कायद्याचे नियम पायदळी तुडवण्यात सरकारी अधिकारी कर्मचारी अग्रेसर..खाजगी वाहनांवर पोलीस,,डॉक्टर, वकील, महाराष्ट्र शासन, लीहल्यास होते दंडात्मक कारवाई… मात्र नियम कायदा धाब्यावर वाहन चालकांकडून होतोय सर्रास नियम भंग…

advertisement

अहमदनगर दि.२६ नोव्हेंबर

अहमदनगर शहरात अनेक ठिकाणी खासगी वाहनांवर पोलिस,डॉक्टर, वकील, महाराष्ट्र शासन,प्रेस, आर्मी असे मोठ्या अक्षरात लिहिलेले दिसते मात्र असे असले तरी ही गोष्ट बेकायदेशीर आहे हे किती जणांना माहित आहे तर सामान्य नागरिकांना बऱ्याच जणांना माहित नसेलही मात्र आरटीओ अधिकाऱ्यांना आणि शहर वाहतूक पोलिसांना हे माहीत असूनही त्यावर कारवाई होताना दिसत नाही.

अशाप्रकारे वाहनांवर पाट्या लावणे किंवा लिहिणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम कायद्याचे उल्लंघन वाहनचालकांवर करणाऱ्या
पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये
नाराजी आहे. अहमदनगर शहरात अनेक खासगी वाहनांवर पोलिस, डॉक्टर, वकील, महाराष्ट्र
शासन असे लिहिले वाहने आढळून येतात. पोलीस नंबर नसलेल्या वाहनांवर कारवाई करतात मात्र या नाव लिहिणाऱ्यावर कारवाई करताना कधीच दिसत नाही.
काय सांगतो कायदा नियमांनुसार नॉन-ट्रान्सपोर्ट वाहनावर शब्द आकृती, चित्र, चिकटवलेले (पोलिस, डॉक्टर,अॅडव्होकेट इत्यादी) वापर करण्यास महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यानुसार बंदी आहे. एखाद्या वाहनांवर पहिल्या वेळेस असे आढळल्यानंतर कारवाई करताना ५०० रुपये तर दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर पकडल्यास १५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा नियम आहे.

मात्र प्रत्यक्षात अशी कारवाई अपवादानेच केली जात
असल्याने मोटारींवर सर्रास असे फलक दिसतात. शहरात अनेक वाहनचालकांकडून वाहनांवर पोलिस,
डॉक्टर, वकील, महाराष्ट्र शासन, भारत सरकार असे लिहिलेल्या पाट्या अधिकारी कर्मचारी यांना घाबरविण्यासाठी किंवा आपला ठसा उमटविण्यासाठी मुद्दामपणे ठेवल्या जात असल्याचे पाहावयास मिळते.
तर प्रेस लिहून मिरवणाऱ्या अनेक चार चाकी आणि दुचाकी गाड्या सर्रास वावरताना दिसतात. अनेक तोताया पत्रकार गाडीवर प्रेस लिहून बिंदकपणे वावरत असतात मात्र जे खऱ्या अर्थाने पत्रकारिता करतात त्यांच्या गाडीवर प्रेस कधीही लिहिलेले नसते कारण त्यांच्या कामाने त्यांची ओळख होत असल्यामुळे अनेक तोताय पत्रकार प्रेस नावाचा आधार घेऊन आपली तुंबडी भरतानाचे चित्र नगर शहरात पाहायला मिळते.
.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular