अहमदनगर दि.१२ जानेवारी
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणाला भारतीय जनता पार्टी कडून अहमदनगर शहरातील माजी नगरसेवक एडवोकेट धनंजय जाधव यांना ए बी फॉर्म न दिल्याने धनंजय जाधव हे अपक्ष उमेदवार म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरले आहेत
नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळते याबाबत चांगलेच तर्क वितर्क लढवले जात होते सुरुवातीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांचे नाव चर्चेत होते मात्र कालांतराने ते नाव मागे पडल्यानंतर धुळ्याचे धनंजय विसपुते आणि अहमदनगरचे धनंजय जाधव यांच्यामध्ये तिकिटासाठी रस्सीखेच सुरू होते मात्र या दरम्यान सत्यजित तांबे भाजपकडून उमेदवारी करणार म्हणून चांगल्या वावड्या उठल्या होत्या मात्र आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी कडून सत्यजित तांबे यांचे वडील विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी माघार घेऊन सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर या चर्चेवर पूर्णविराम पडला आणि अखेरच्या क्षणाला शेवटी धनंजय जाधव यांना भारतीय जनता पार्टी तर्फे अधिकृत पक्षाचा एबी फॉर्म देण्यात न आल्यामुळे आता धनंजय जाधव हे अपक्ष उमेदवार राहिले आहेत.