Home राजकारण दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुमारे एक तास चर्चा तर देवेंद्र फडवणीस दिल्लीमध्ये तळ ठोकून शिवसेनेचे नाराज आमदार घेणार अमित शहांची भेट

मुंबई दि.२१ जुन

मुंबईमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून शिवसेनेचे काही आमदार नॉटरिचेबल झाले आहेत ते सर्व आमदार गुजरातमध्ये असल्याचं समजतंय त्याचबरोबर आता भाजपाच्या गोटातही मोठी हालचाल सुरू आहेत.

तर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नाशिकला जाणार होते मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडवणीस हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मुंबई दिल्ली मध्ये राजकीय घडामोडींना अत्यंत वेग आला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट जेपी नड्डा यांच्या निवास्थानी झाल्यानंतर सुमारे एक तासाच्या चर्चेनंतर नड्डा आणि अमित शहा एकाच गाडीतून रवाना झाले आहेत. त्यामुळे आता या बैठकीनंतर भाजपची भूमिका काय असणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे तर गुजरातमध्ये असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे आपली भूमिका कधी मांडतील याबाबत शिवसेनेसह राज्यातील सर्वच पक्षांना आणि कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version