मुंबई दि.२१ जुन
विधान परिषदेच्या निवडणुकी नंतर राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत असून कालच्या निकालाचा परिणाम समोर येऊ लागला आहे राज्यात महाविकास आघाडीतील शिवसेने मध्ये अंतर्गत नाराजी समोर येत अडून शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि मंत्री असणारे एकनाथ शिंदे हे गुजरात मधील सूरत मधील एका हॉटेल मध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे.ये ज्या हॉटेल मध्ये मुक्कामी आहेत त्या हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांनी मोठी सुरक्षा वाढवली असल्याची माहिती मिळतेय.
जेष्ठ संपादक दीक्षित सोनी यांच्या माहिती नुसार सेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 18 पेक्षा जास्त आमदार सूरतमध्ये आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. गुजरात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्या संपर्कात आहेत
शिवसेनेतल्या घडामोडींचं गांभीर्य वाढल्याचे मोठे संकेत, संजय राऊत यांचा दिल्ली दौरा रद्द
शिवसेनेतल्या घडामोडींचं गांभीर्य वाढल्याचे मोठे संकेत, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द केला असून राष्ट्रपती निवडणुकीसाठी शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीसाठी आज संजय राऊत दिल्लीत हजर राहणार होते, पण एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे संजय राऊत दिल्ली ऐवजी आता मुंबईतच थांबणार आहेत
एका वृत्त वहिनीच्या हवल्या नुसार काल रात्रीपासून एकनाथ शिंदे हे गुजरामध्ये आहेत. सूरतच्या ली मेरिडिअन हॉटेलात ते थांबले आहेत. सुरत एअरपोर्टपासून दोन मिनिटांवर हे हॉटेल आहे. एकनाथ शिंदेच्या नाराजीनाट्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जातेय. या हॉटेलबाहेरचोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तसंच कोणत्याही माध्यमकर्मींना जाण्यात मज्जाव करण्यात आला आहे.
गुजरातचे गृहमंत्री असलेले सुरतचे भाजपचे आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचं समोर आलं आहे. सांघवी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचंही समोर आलं आहे.
काँग्रेस मध्ये पण आलबेल नाही
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे आमदार हे निधीवरून नाराजी व्यक्त करत आहे. त्यांनी अनेक वेळा आपल्या मंत्र्यांच्या कानीसुद्धा घातले. एवढंच नाहीतर हा वाद हायकमांडपर्यंत सुद्धा गेला होता. पण, काँग्रेसच्या मंत्र्यांनी सगळं काही आलबेल असल्याचं सांगून वादावर पडदा टाकला होता. पण, आता त्याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही मंत्र्यांवर या पराभवाचे खापर फुटण्याची शक्यता आहे
काँग्रेसच्या ही सर्व आमदारांना आज मंगळवारी रात्रीपर्यंत दिल्ली येथे तातडीने बोलाविण्यात आले आहे. बुधवारी या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयातून आमदारांना तसे फोन जात आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.