HomeUncategorizedआली आली दिवाळी आली.. खव्याचे पदार्थ खाण्याआधी बनावट खवा आहे का...

आली आली दिवाळी आली.. खव्याचे पदार्थ खाण्याआधी बनावट खवा आहे का तपासून पाहण्याची वेळ आली…

advertisement

अहमदनगर दि.७ नोव्हेंबर

दिवाळी जवळ आली असून अनेक लोक दिवाळीसाठी विविध मिठाई दुकानातून रेडीमेड बनवलेले पदार्थ आणून दिवाळीचा फराळ म्हणून खात असतात तर एकमेकांना भेट देण्यासाठी याचा उपयोग होतो. मात्र खव्यापासून तयार केलेलेले पेढे, बर्फी, मिठाई पदार्थ खाताय मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दुधाच्या पावडरमध्ये वनस्पती, रुची तेल मिक्स करुन त्यापासून बनावट खवा तयार करता येतो. दुधाची पावडर असते दूध नसल्यामुळे हा खवा आपल्या शरीराला घातक असतो.

अन्न औषध प्रशासनाने मध्यंतरी एक जीआर काढून प्रत्येक मिठाईच्या दुकानांमध्ये मिठाईला एक्सपायरी डेट असावी (मुदत) याकरता प्रत्येक मिठाईच्या कॅरेट पुढे एक्सपायरी डेट (पदार्थ किती दिवस टिकेल याचा कालावधी) लावणे बंधनकारक केले होते मात्र हा नियम फक्त आता कागदावरच राहिलेला दिसतो आहे अनेक मिठाईच्या दुकानातून हे मुदत दर्शवण्याचे कागद केव्हाच निघून गेले आहेत.

दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान अन्न औषध प्रशासन आणि पोलीस लाखो करोडो रुपयांचा बनावट खावा पकडत असतात हा खवा नष्ट होतो मात्र दरवर्षी तेवढाच खवा पुन्हा निर्मित होऊन तो विविध शहरांमध्ये विकला जातो दिवाळीचा सण मोठा असल्याने या दिवसांमध्ये खव्याला मोठी मागणी असते त्यामुळे केमिकल युक्त खवा अनेक ठिकाणी नागरिकांच्या पोटामध्ये पोहोचलेला असतो. त्यामूळे ग्राहकांनी खरेदी करताना काळजी घ्यावी. अन्यथा केमिकलयुक्त, दूध विरहित खवा खाल्ल्यामुळे गंभीर आजाराला आमंत्रण दिले जाऊ शकते.

अहमदनगर शहरातही अनेक वेळा बनावट खवा पकडला गेला आहे त्यामुळे खव्याचे पदार्थ खाताना चांगल्या दुकानातूनच घेणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular