अहमदनगर दि.५ नोव्हेंबर
अहमदनगर जिल्हा शेजारील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि आता सोलापूर या चारही बाजूने गेल्या काही दिवसांपासून उत्तेजक द्रव्य म्हणजेच ड्रग्स सापडत आहेत.अहमदनगर शहराजवळच असलेल्या पैठण तालुक्यातही याचे लोन पोहोचले आहे. त्यामुळे हे लोन नगर शहरात पोहोचायला वेळ लागणार नाही एव्हाना लोन पोहोचलेही असेल असे म्हणता येईल.
आजकालची तरुण पिढी नशेसाठी काहीही करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पालकांनी याकडे नक्कीच गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
या ड्रग्स बरोबर मोठ्या शहरांप्रमाणे आता अहमदनगर शहरातही कॅफे या गोड नावाखाली चालू असलेले अश्लील चाळे करण्याचे ठिकाणे ठिकाणे बंद करण्याची गरज आहे. कारण या कॅफे मागील पडद्यामागे बरच काही गोष्टी होत असतात त्यामुळे ही कॅफे बंद पद्धत बंद करून खुले हॉटेल करणे गरजेचे आहे.
अनेक वेळा बघणाऱ्याला ही लाज वाटते असे प्रकार या ठिकाणी सुरू असल्याची चर्चा नगर शहरात आहे. अक्षरशः शाळेच्या ड्रेसवर मुलं मुली या कॅफेमध्ये काही ठराविक लॉज वर बिनदक्कपणे जात येत असल्याची माहिती समोर येत असून अल्पवयीन वयातच नको त्या गोष्टी करून नंतर पश्चातापाची वेळ येते त्यामुळे आपल्या मुलांकडून लक्ष ठेवणे फार गरजेचे झाले आहे सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जगात ही मोठी समस्या भविष्यात संपूर्ण जगासमोर उभी राहणार आहे.
याला जबाबदार नगर शहरातील प्रत्येक नागरिक आहे मग तो राजकीय असो सामाजिक असो किंवा उद्योगपती असो कारण जेव्हा एखाद्या कॅफेचे शुभारंभ होतो तेव्हा एका मोठा व्यक्तीला बोलवून या कॅफेचा शुभारंभ करण्यात येतो. जो माणूस या कॅफेचे उद्घाटन करतो त्या माणसाचा पाठीराखा म्हणून त्या कॅफे मालकाचे नाव होतं आणि मग तो बिनधास्तपणे या कॅफेच्या नावाखाली वेगळा धंदा सुरू करतो तेव्हा शुभारंभ करण्यासाठी आलेल्या पाहुण्याला भविष्यात हे माहिती नसते की त्या ठिकाणी काय चालते मात्र प्रशासन असेल किंवा इतर आजूबाजूची नागरिक त्या शुभारंभ करणाऱ्या माणसाच्या नावानेच चर्चा करत राहतात. आणि कॅफे चालवणारा आरामात पैसे कमवत राहतो.
व्यवसाय कोणाला नको असतो व्यवसायाची संधी प्रत्येकाला मिळायलाच पाहिजे मात्र तो व्यवसाय कसा असावा याबाबतही काहीतरी प्रामाणिकपणा असावा कॅफेच्या नावाखाली नंगानाच आणि हुक्का पार्लरच्या नावाखाली नशेचा धंदा करणे म्हणजे व्यवसायाशी आणि समाजाशी अप्रामाणिकपणा दाखवणे असंच असते.
अहमदनगर शहर वाढत चालले आहे त्याचबरोबर शिक्षणाची आधुनिक पद्धतही वाढत असून अहमदनगर शहरात इंजिनिअरिंग, नर्सिंग, मेडिकल कॉलेज झाले असल्यामुळे परराज्यातून नगर शहरात मुले ,मुली शिक्षणासाठी येत आहेत, त्याचप्रमाणे व्यवसाय निमित्त कंपनीमार्फत अनेक तरुण-तरुणी नगर शहरात येत असतात यांच्या माध्यमातूनच काही तरुण-तरुणी नशेबाज होऊन हे लोन नगर शहरात आणत आहेत.
विकेंड म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अनेक तरुण-तरुणी पुण्यात पार्टी करण्यासाठी जातात आता हे लोन हळूहळू नगरमध्ये सुरू होत असून नगरमध्ये कॅफे आणि हुक्का पार्लरच्या नावाखाली नशेचा बाजार सुरू आहे.
याबाबत आता खर तर आई-वडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे आपला मुलगा कोठे जातो कोणाबरोबर जातो कोणच्या हॉटेलमध्ये जातो याची ईत्तम भूत माहिती ठेवणे गरजेचे आहे. मुलाचे किंवा मुलीचे थोडे जरी वाकडे पाऊल पडले तर त्याचे आयुष्य बरबाद होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे प्रत्येक मुलगा हा चुकीचा नसतो मात्र चुकीची संगत किंवा तरुणांमध्ये चिकित्सक बुद्धी असल्यामुळे मुलांकडून चुकून चुकीचे पाऊल पडते आणि मग पुढे भविष्यात मागे करण्याची संधी गमावलेले तरुण-तरुणी नशेच्या किंवा अनेक चुकीच्या मार्गावर जातात.तसेच कॅफेच्या माध्यमातून अनेक विचित्र घटना घडत असतात पुढे पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच एक पाऊल पुढे टाकून आपल्या मुलाकडे किंवा मुलीकडे लक्ष ठेवणे प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. क्रमशः