Home Uncategorized असल्या पत्रकारांना बोलवू नका माझ्या पत्रकार परिषदेला. सुपारी घेऊन प्रश्न विचारतात संजय...

असल्या पत्रकारांना बोलवू नका माझ्या पत्रकार परिषदेला. सुपारी घेऊन प्रश्न विचारतात संजय राठोड यांच्या प्रश्नावर भाजपनेत्या चित्रा वाघ यांचा संताप..

यवतमाळ दि.११ नोव्हेंबर
भाजप नेत्या चित्रा वाघ आज यवतमाळ दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना संजय राठोड प्रकरणाबाबतचा सवाल करताच चित्रा वाघ भडकल्या. त्या तावातावाने उभ्या राहिल्या आणि पत्रकारांवर आगपाखड करण्यास सुरुवात केली.

भडकलेल्या चित्रा वाघ यांनी पत्रकारांना हिंदी भाषेतूनच झापण्यास सुरुवात केली. न्याय व्यवस्था है क्या आप? मै गई हू ना न्यायालय में. आप मुझको मत सिखाईये, असं त्यांनी संतापत म्हटलं.

असल्या पत्रकार ना बोलवू नका माझ्या पत्रकार परिषदेला. सुपारी घेऊन प्रश्न विचारतात, असं म्हणत चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. यावेळी त्यांच्या संतापाचा पारा अनावर झाला होता. त्यांनी हातवारे करतच पत्रकारांना झापलं.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version