अहिल्यानगर दिनांक २० ऑक्टोबर
साध्या घशाच्या त्रासासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या 79 वर्षीय वृद्धाला करोना पॉझिटिव्ह नसतानाही खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर शरिरातील अवयवांची तस्करी करण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशावरून शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात अहिल्यानगर शहरातील सहा नामांकित डॉक्टरांसह अनोळखी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी डॉक्टर फरार झाले असून. आज पाच डॉक्टरांपैकी दोन डॉक्टरांनी अटकपूर्व जामिनीसाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.
डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर या दोघांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला असून या अर्जावर आता उद्या म्हणजेच मंगळवारी सुनावणी होणार आहे.

अशोक खोखराळे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दाखल झालेल्या गुन्ह्यातपाच डॉक्टरांपैकी दोन आरोपींनी अटकपूर्व जामीन ठेवल्याची माहिती कळताच स्वतः फिर्यादी अशोक खोकराळे यांनी जिल्हा न्यायालयात जाऊन या प्रकरणात आपल्याला बाजू मांडण्याची संधी मिळावी अशी विनंती केली. त्या नंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी उद्या म्हणजेच मंगळवारी ठेवली असून दुपारी तीन वाजता फिर्यादी अशोक खोकराळे स्वतः जिल्हा न्यायालयात बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.