अहिल्यानगर दिनांक १८ ऑक्टोबर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देऊन बबनराव खोकराळे यांच्या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी आरोपी असलेल्या सर्व डॉक्टरांना जलद गतीने अटक करून बॉम्बे नर्सिंग होम कायदा अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश तुकाराम जाधव यांनी शिष्टमंडळासह पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी १. डॉ. गोपाल बहुरूपी २. डॉ. सुधीर बोरकर 3. डॉ. मुकुंद तांदळे ४. डॉ. असदीप झावरे ४. डॉ. सचिन पांडुळे सह डॉ. विखे पाटील हॉस्पिटल, विळद घाटने संबंधित डॉक्टर, आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर बॉम्बे नर्सिंग होम कायदा अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून कोविड काळात वरील डॉक्टरांनी संगणकाने कट कारस्थान करून जनतेची लूट करून अनेक नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत आहेत. सदर दरील गुन्हा उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशान्वये दाखल झाला असून सदर गुन्हा वरील सर्व दोषी डॉक्टरांना त्वरित अति जलद अटक करण्यात यावी तसेच वरील सर्व डॉक्टरांचे हॉस्पिटलचे बॉम्बे नर्सिंग होम कायद्यान्वये परवाने निलंबित करून रद्द करण्यात यावे. वरील सर्व डॉक्टर अवयव तस्करी बाबत त्यांच्यावर आरोप असून जनतेच्या जीवाशी खेळून जनतेचा लुटण्याचा धंदा या टोळीने संगमताने सुरू ठेवला आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आय. एम. ए. यांनी आंदोलन करण्याची धमकी दिली आहे. सदर आय. एम. ए. संघटनेच्या सर्व सभासद हॉस्पिटलवर बॉम्बे नर्सिंग होम कायद्यान्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व जनतेची होणारी लूट त्वरित थांबवण्यात यावी. सदर डॉक्टरांना त्वरित जनहितार्थ अटक करण्यात यावी अशी मागणी गिरीश जाधव यांनी केली आहे. या नियोजनाच्या प्रती जिल्हाधिकारी , अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त आणि आरोग्य विभागालाही देण्यात आल्या आहेत.