HomeUncategorizedभटकी कुत्री निर्बीजीकरण करण्याचा ठेका पुन्हा त्याचा संस्थेला? शॅडो पार्टनरची चर्चा मनपात...

भटकी कुत्री निर्बीजीकरण करण्याचा ठेका पुन्हा त्याचा संस्थेला? शॅडो पार्टनरची चर्चा मनपात जोरात.. शिवसेनेने गंभीर आरोप करूनही ठेका त्याचा संस्थेला…

advertisement

अहमदनगर दि.३० ऑगस्ट

अहमदनगर शहरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले आहेत मात्र अजूनही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे अहमदनगर शहरात अंदाजे दहा हजार पेक्षा जास्त मोकाट कुत्रे असून या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक लहान मुले जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. शहरातील ही मोकाट कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी पिंपळगाव माळवी येथे श्वान निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. सुरवातीला ‘पीपल फॉर ॲनिमल’ या संस्थेला निर्बीजीकरणाचे काम देण्यात आले. शहरातील सुमारे साडेपाच हजार कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचा दावा या संस्थेने केला होता. असे असले, तरी शहरातील कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढलेली आहे. आज रोजी शहरात मोकाट दहा हजारांपेक्षा अधिक कुत्री असून, त्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

त्या सांस्थेच्या ठेक्यची मुदत संपल्या नंतर पुन्हा हा ठेका त्या संस्थेला देऊ नये म्हणून शिवसेनेने नुकतीच मागणी केली होती.कागदावर निर्बीजीकरण करून मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता तसेच या संस्थेचा शॅडो पार्टनर म्हणून राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप केला होता.

आता पुन्हा अहमदनगर शहरातील श्वान निर्बीजीकरण ठेका पुन्हा त्याचा संस्थेला दिला असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महानगर पालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुत्रे प्रश्ना बाबत गंभीर आरोप करूनही त्या संस्थेला ठेका देण्यात आला आणि शिवसेनेने आरोप केलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी
शॅडो पार्टनर असल्याचा या वरून सिद्ध होतेय का?
जर राजकीय पदाधिकारी असे शॅडो पार्टनर असतील तर नगरचे खरंच भले होणार का? शहरात कचऱ्याच्या ठेक्या मध्ये सुध्दा राजकीय पदाधिकारी शॅडो पार्टनर असल्याची चर्चा सध्या मनपात सुरू असून मनपा अधिकाऱ्यांवर दबाव टाकून टेंडर पदरात पाडून घेणे हे काम सध्या सुरू असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

शहरात अजूनही अनेक भटक्या कुत्र्यांना पिल्ले होत आहेत मग निर्बीजीकरण कोणाचे केले असा सवाल उपस्थिती होतोय.आणि शॅडो पार्टनर
मुळे बिले मिळण्यास अडचण निर्माण होत नसेल त्या मुळे नगरकरांनी कर भरायचा आणि शॅडो पार्टनर लोकांनी आपले घर भरायचे असेच सुरू राहणार .

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular