Home शहर महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे अपहार प्रकरणातून मुक्त.

महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे अपहार प्रकरणातून मुक्त.

अहिल्यानगर दिनांक २० सप्टेंबर

अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागातील अपहार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून निलंबित वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचे नाव वगळण्याचा आदेश मुख्य जिल्हा न्यायाधीश अंजु शेंडे यांनी दिला आहे.

Oplus_131072

आरोग्य विभागात १६.५० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी डॉ. बोरगे यांच्यासह कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपास करून कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी डॉ. बोरगे यांचा गुन्ह्यात सहभाग आढळत नसल्याचा अहवाल कनिष्ठ न्यायालयात दाखल केला होता. तो फेटाळण्यात आला होता. त्या विरोधात डॉ. बोरगे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात पुणरीक्षण अर्ज दाखल केला होता. तो मंजूर करण्यात येऊन डॉ. बोरगे यांचे नाव त्या गुन्ह्यातून वगळण्याचा आदेश देण्यात आला. त्यांच्यावतीने ऍड. सुधीर बाफना यांनी काम पाहिले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version