Home क्राईम आमदार संग्राम जगताप आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाला दोन दिवस उलटत नाही तोच...

आमदार संग्राम जगताप आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाला दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा झेंडीगेट परिसरात गोमांस विक्रीला सुरुवात..

अहिल्यानगर दिनांक 20 सप्टेंबर

गेल्या चार दिवसांपूर्वी गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे अवशेष नगर शहरातील नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील ईदगाह मैदान समोरील एका नालीत टाकली होती . ही बाब हिंदुत्ववादी संघटनेच्या निदर्शनास आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेंसह अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप, श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करून आरोपींना पकडण्यासाठी मागणी केली होती. तसेच अवैद्य कत्तलखाने जमीनदोस्त करण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली होती.काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना पकडले होते. त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या मागणीनुसार अवैध कत्तलखान्यांवर महानगरपालिकेने आणि पोलीस प्रशासनाने जेसीबी चालवून ते जमीन दोस्त केले होते.

Oplus_131072

या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच पुन्हा झेंडीगेट भागात गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आज सुभेदार गल्ली येथील कुरेशी मोहिल्यात जाऊन छापा टाकून
42.400/- रु.किं.चे गोवंशीय जणावरांचे मांस जप्त केले आहे.

कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी समीर अकील शेख, (वय 20 वर्षे, रा. गांधीनगर, बोल्हेगाव, अहिल्यानगर, ) फरार नसीर कुरेशी (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही), फरार- अप्पु उर्फ अप्रोज कुरेशी यांचेविरुध्द पो. काँ/ सोमनाथ सुधाकर केकाण यांचे फिर्यादीवरुन भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम- 271, महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन 1995 चे सुधारीत सन 2015 चे कलम-5 (अ), 5 (क), 9, 9 (अ) तसेच प्राण्यांना कुरतेने वागण्यास प्रतिबंध करणेबाबत अधि. 1960 चे कलम- 11. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ व्ही. आर. बोरगे हे करीत आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे , अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे , उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे पोसई/गणेश देशमुख, पोहेकों / विनोद बोरगे, पोहेकों / बाळकृष्ण दॉड, पोहेकों/ विशाल दळवी, पोहेकों सलीम शेख, पोहेकॉ/ वसीम पठाण, पोना/ अविनाश वाकचौरे, पोना /विजय ठोंबरे, पोकों / सत्यजीत शिंदे, पोकॉ/ सोमनाथ केकाण, पोकॉ/ शिरीष तरटे, पोकॉ सचिन लोळगे, पोकों / दत्तात्रय कोतकर, पोकॉ/ हंडाळ, मपोकों/ प्रतिभा नागरे, दक्षिण मोबाईल सेलचे पोकों/राहुल गुंडु यांचे पथकाने केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी जो आरोपी पकडला होता. तो एका नगरसेविकेचा मुलगा असून नगर शहरात शेठ म्हणून मिरवणाऱ्या नेत्याचा पुतण्या आहे. त्यामुळे राजकीय पाठबळ असल्यामुळेच गोवंशी जनावरांची अवैद्य कत्तल करणाऱ्या लोकांची हिम्मत वाढत आहे. तसेच काक नावाचा म्होरक्या पोलिसांना घाबरत नसल्याने पोलिसांनी आता अवैद्य गोवंशय कत्तल करणाऱ्या मोहरक्यांचा शोध घेऊन त्यांच्या मुश्क्यावणे गरजेचे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version