अहमदनगर दि.२८ ऑगस्ट
फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारानंतर झालेल्या पार्टीत विषारी दारू सेवन केल्यामुळे पांगरमलमधील नऊ जणांचा बळी गेला होता. या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग केल्यानंतर सीआयडीने तपास करून पांगरमलप्रकरणी २० जणांविरुद्ध दोषारोपपत्र येथील न्यायालयात दाखल केले आहे.
याप्रकरणी निवडणुकीसाठी उभे असलेल्या मंगल आव्हाड आणि भाग्यश्री मोकाटे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात मंगल आव्हाड यांना न्यायालयाने जामीन दिला असल्यामुळे त्या जमिनीवर बाहेर आहे तर गुन्हा दाखल झाल्यापासून भाग्यश्री मोकाटे या २०१७ पासून फरार होत्या. विशेष म्हणजे भाग्यश्री मोकाटे या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या मात्र निवडणुकीच्या निकालापासूनच त्या फरार असल्यामुळे त्या एकदाही जिल्हा परिषद मध्ये आल्या नाहीत.
जवळपास सहा वर्षानंतर भाग्यश्री मोकाटे या पोलिसांना सापडल्या असून सीआयडीने भाग्यश्री मोकाटे यांना पुणे येथून ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय त्यांना अहमदनगर येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे.