गुहाटी दि.२९ जून
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून शिवसेनेचे बंडखोर आमदार आसाम राज्यातील गुवाहाटी येथे एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत मात्र सध्या आसाम मधील काही शहरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले असल्याने ठीक ठिकाणी पूर परिस्थिती उदभवली आहे. या पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत त्यामुळे आसाम मध्ये नागरीक पूर परिस्थितीशी सामना करत आहेत.
शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांबरोबर गुहाटी मध्ये मुक्कामाला असून एकनाथ शिंदे यांच्या गटाने आसाम मधील पूरग्रस्त भागासाठी 51 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत आसामच्या मुख्यमंत्री निधीमध्ये जमा होणार आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार आज किंवा उद्या गुहाटी मधून निघून महाराष्ट्रात येणार आहेत. गुहाटी मधून निघता निघता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आसाम सरकारला ही अनोखी भेट दिली आहे.