Homeराजकारणया तीन तालुक्यांनी बिघडवले महायुतीचे सुजय विखे पाटील यांचे गणित... नगर शहरात...

या तीन तालुक्यांनी बिघडवले महायुतीचे सुजय विखे पाटील यांचे गणित… नगर शहरात अपेक्षित असलेले मताधिक्य मिळाले मात्र त्या दोन तालुक्यांनी पाणी फिरवले

advertisement

अहमदनगर दिनांक 5 जून
अहमदनगर लोकसभेची निवडणूक पार पडली आणि त्यानंतर आता निकाल हाती आले आहेत. या निकालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून जे चित्र समोर होते ते चित्र मतदान यंत्रात आले नाही आणि जे चित्र अस्पष्ट होते ते मतदान यंत्राद्वारे जनतेने दाखवून दिले. ही निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेने हातात घेतली होती असेच म्हणता येईल कारण भाजपचा निवडणुकीचा फुगा हा कालच्या मतदानानंतर फुटला आहे. विशेष म्हणजे ज्या पट्ट्यात महायुतीला मतदानाची अपेक्षा होती त्याच पट्ट्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

शेवगाव पाथर्डी मधून अपेक्षेप्रमाणे सुजय विखे पाटील यांना मतदान मिळाले 106392 एक लाख 63 हजार 992 तर निलेश लंके यांना शेवगाव पाथर्डी मध्ये 98 हजार 551 इतके मतदान मिळाले. राहुरी मतदार संघात डॉक्टर सुजय विखे पाटील एक लाख 65 हजार 558 तर राहुरीला महाविकास आघाडीचे निलेश लंके यांना 94 हजार 686 इतके मतदान मिळवले आहे. राहुरी आणि शेवगाव मध्ये निलेश लंके मागे असले तरी त्यांना श्रीगोंदा मतदार संघाने आणि पारनेर मतदार संघाने भरभरून मतदान केले डॉक्टर सुजय विखे पाटील यांना श्रीगोंदा येथून 86249 इतके मतदान मिळाले तर निलेश लंके यांना 118960 इतके भरभरून मतदान मिळाले या ठिकाणी जवळपास 32 हजार सातशे अकरा मतांचा फरक असून त्याचप्रमाणे पारनेर मतदारसंघात सुजय विखे पाटील यांना 92340 तर निलेश लंके यांना 130440 इतके मतं मिळाली या ठिकाणी सुद्धा जवळपास 38100 इतका मोठा फरक असून याचप्रमाणे कर्जत जामखेड ने सुद्धा सुजय विखे पाटील यांना 95516 तर निलेश लंके यांना 104684 इतके भरभरून मतदान दिले त्यामुळे या ठिकाणी सुद्धा जवळपास 9168 इतक्या मतांचा फरक मिळाला यामुळे निलेश लंके यांनी जोरदार मुसंडी मारली होती. खासदार सुजय विखे पाटील हे अहमदनगर शहरात मोठ्या फरकाने पुढे होते अहमदनगर शहरात सुजय विखे पाटील यांना
105849 तर निलेश लंके यांना 74263 इतके मताधिक्य मिळाले या ठिकाणी सुजय विखे पाटील हे 31 हजार 586 इतक्या मताने आघाडीवर होते.
तर पोस्टर मतदानातही निलेश लंके यांना सुजय विखे यांच्या पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले निलेश लंके यांना 2653 तर सुजय विखे पाटील यांना 2300 मतदान मिळाले या मध्ये 353 मतांनी या ठिकाणी सुद्धा निलेश लंके आघाडीवर होते.

डॉक्टर सुजय विखे पाटील हे नगर शहर शेवगाव पाथर्डी आणि राहुरी वगळता इतर ठिकाणी आपला करिष्मा दाखवू शकले नाही तर निलेश लंके हे प्रत्येक ठिकाणी सुजय विखे यांच्या जवळपास मताधिक्य घेत गेल्यामुळे सहाव्या फेरीनंतर निलेश लंके यांनी मताधिक्यात जी मुसंडी मारली ती शेवटच्या 27 फेरीपर्यंत कायम होती त्यामुळे अखेर त्यांचा विजय निश्चित झाला अठ्ठावीस हजार 929 मतांनी निलेश लंके विजयी झाले. मात्र या विजयाच्या गणितात ग्रामीण भागाने निलेश लंके यांच्यावर भरभरून प्रेम केल्याचे दिसून येत आहे तर ज्या ठिकाणी सुजय विखे पाटील यांना मताधिक्य मिळेल त्या कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा या ठिकाणी अपेक्षित मतदान न मिळाल्यामुळे सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आहे

(पोस्टल-2300)सु थो

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular