अहमदनगर दिनांक 2 जुलै
लोकसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेचे निवडणुकीचे सर्वांना वेध लागले आहे लोकसभेत महाविकास आघाडीने विजय मिळवल्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने विधानसभेची तयारी करू लागले असून महाविकास आघाडीसह महायुतीच्या घटक पक्षांमधूनही पदाधिकारी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
मात्र या सर्व गदारोळात एक विषय समोर आला असून निष्ठावंतांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष स्मिता अष्टीकर यांनी केला आहे. स्मिता अष्टेकर म्हणजे शिवसेनेच्या रणरागिणी होत्या ज्या कोणी त्यांचे आंदोलन पाहिले आहेत त्या सर्व शिवसैनिकांना स्मिता अष्टेकर म्हणजे काय हे नक्कीच माहीत आहे. कोणताही प्रश्न असो तो तडीस नेल्या शिवाय माघार नाही हाच स्वभाव स्मिता अष्टेकर यांचा असल्यामुळे अनेक वेळा स्व पक्षातील नेतेही नाराज झाले तरी चालतील मात्र गरिबाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी कधीही सोडली नव्हती.
पक्षाचे काम करत असताना आंदोलनाच्या अनेक राजकीय केसेस त्यांच्यावर झाल्या यातूनच एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल पाच वेळा तडीपार होऊनही त्यांनी शिवसेनेचे साथ सोडली नाही. शेवटपर्यंत शिवसेनाच हा पक्ष राहील हे त्या नेहमीच सांगत आल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र आपल्या हातावर गोंदून त्यांनी निष्ठा काय असते हे दाखवून दिले आहे. मात्र त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना कोणीच मदत केले नाही हेही शल्य त्यांच्या मनात अद्यापही आहे.
घराला कोणताही राजकीय वारसा नाही लहान मुलगा पती आणि सर्वसामान्य कुटुंबीय यातून पुढे आलेल्या स्मिता अष्टेकर या शिवसेनेच्या रणरागिने म्हणून प्रसिद्ध होत्या याच जोरावर त्यांनी भिंगार छावणी मंडळाचे सदस्यपद हस्तगत केले होते. सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटत असणाऱ्या स्मिता अष्टेकर यांना न्याय कधी मिळणार कारण निवडणूक आली की नेत्यांच्या घरातील मुलं महिला यांना प्राधान्य दिले जातं मग स्मिता अष्टेकर यांच्यासारख्या सर्वसामान्य आणि कोणतेही राजकीय वलय नसणाऱ्या घरातून आलेल्या महिलेला कधी न्याय मिळणार असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
आता विधानसभा आली आहे त्यामुळे या निवडणुकीत स्मिता अष्टेकर यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून सर्वच पक्षांनी मिळून उमेदवारी द्यावी कोणाची मुलगी कोणाची बहीण कोणाची आई या नात्याने या निवडणुकीत सर्वांनी मदत करावी असं मत स्मिता अष्टेकर यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेसाठी अनेक वर्ष काम केले अनेक लोकांना न्याय मिळवून दिला आणि केसेस अंगावर घेतल्या त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आणि आता सर्वच पक्षांनी मिळून मला मदत करावी आणि निवडून आणावं असं मतही स्मिता अष्टेकर यांनी व्यक्त केल आहे.विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात अनेक जण इच्छुक असल्याचे जाहीर करत आहेत मात्र राजकीय सामाजिक कामाच्या आणि पक्षासाठी निष्ठावंत अशा मेरीटवर माझी वर्णी का लागू नये कारण मला सांगण्याची गरज नाही असे काम जनतेने पाहिले आहे असेही स्मिता अष्टेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत माझ्या नावाचा शिवसेनेचा दोन्ही गटांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आणि भाजपच्या सर्वच गटांनी विचार करून सर्वसामान्य महिलेला न्याय द्यावा अशी भूमिका स्मिता अष्टेकर यांनी मांडली आहे. स्मिता अष्टेकर यांच्या नावाची विधानसभेच्या उमेदवारी बाबत एन्ट्री झाल्याने आता शिवसैनिक आणि शिवसेना नेते नेमकं काय भूमिका घेतात हेच पाहणे योग्य ठरेल.