Homeराज्यदूध उत्पादन शेतकऱ्यांना मोठा दिलासा : १जुलै पासून दुधाला 30 रुपयाचा...

दूध उत्पादन शेतकऱ्यांना मोठा दिलासा : १जुलै पासून दुधाला 30 रुपयाचा भाव आणि ५ रुपये अनुदान! मंत्री विखे पाटील यांचे सभागृहात निवेदन,शेतकऱ्यांना दिलासा

advertisement

शिर्डी दि. १प्रतिनिधी

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात दूध उत्पादन शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रुपये तर शासनाकडून ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. सदरचे दर हे 1 जुलै पासून राज्यभर लागू केले जातील असे स्पष्ट करतानाच दुध भुकटी करीता प्रति किलो ३० रूपये अनुदान देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री विखे पाटील यांचे सभागृहात निवेदन,शेतकऱ्यांना दिलासा
राज्यभर दुधाच्या दरावरून दूध उत्पादक शेतकरी चिंतेत असताना राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि दुधाचे दर निश्चित करण्यासाठी सोमवारी मंत्रालय येथील परिषद सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राज्यभरातील सहकारी तथा खासगी दूध उत्पादक संघाचे प्रतिनिधी, दूध उत्पादन शेतकऱ्यांचे प्रतिनिधी त्याच बरोबर पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्यासह आमदार शिवाजीराव क्रडिले, माजी.आमदार सदाभाऊ खोत, , आमदार विनायक कोरे, आमदार मंगेश चव्हाण तसेच एनडीडीबीचे व्यवस्थापकिय संचालक अनिल हातेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर बैठकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूधंसघाच्या अडचणी समजून घेतल्या. त्याच बरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून त्यावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहीती मंत्री विखे पाटील यांनी सभागृहात दिली.

राज्यात सध्या सहकार दूध संघ आणि खासगी दूध संघाकडून प्रतिदिन साधारण 1कोटी 62 लाख 80 हजार दूध संकलन केले जाते. त्यातील दुधाची गरज पूर्ण झाल्यावरही अतिरिक्त दूध हे बुकटी तथा बटर बनविण्यासाठी पाठविले जाते. याबाबतही सदर बैठकीत महत्वाची चर्चा करण्यात आली. बुकटी व बटर प्रकल्पांनाही नुकसान होणार नाही यासाठी सरकार विचाराधीन असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

यावेळी मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, अनुदानाची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल. मागील रखडलेल्या अनुदानासाठी 15 जुलै पर्यंत शासनाच्या संकेतस्थळावर माहिती अद्यावत करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली तर राज्यभर सरसकट खासगी तथा सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 30 रुपये प्रतिलिटर दर दिला जाणार आहे. हे दर 1 जुलैपासून लागू केले जातील. तसेच जे अतिरिक्त दूध बुकटीसाठी पाठविले जाते. त्यांना सुद्धा शासनाकडून 30 रुपये प्रतिकिलो शासनाकडून अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचे विखे पाटील म्हणाले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular