Homeशहरनाशिक पदवीधर निवडणुकीत नेमका गेम कोणाचा... निष्ठेला लाथ तर आयारामंचा सन्मान...फक्त आपला...

नाशिक पदवीधर निवडणुकीत नेमका गेम कोणाचा… निष्ठेला लाथ तर आयारामंचा सन्मान…फक्त आपला ‘ गेम ‘ आणि ‘ फिटनेस ‘ चांगला ठेवा, भाजपचे इच्छुक उमेदवार धनंजय जाधव यांचा सुचक मेसेज

advertisement

अहमदनगर १४ जानेवारी

पुर्वी कसे एका टीम चा प्लेयर एकाच टीम कडुन खेळायचा आणि आता IPL मधे बघा. बड्या मालकाच्या टीम्स आहेत ते बरोबर फॉर्म मधला प्लेयर शोधतात व आपल्या टीम कडून खेळवतात…प्लेयर्स ने खूप टेन्शन घेऊ नये, हे नाहीतर पुढचे season खेळू.. फक्त आपला ‘ गेम ‘ आणि ‘ फिटनेस ‘ चांगला ठेवा

असा संदेश देत भारतीय जनता पार्टी कडून पदवीधर निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ऍड. धनंजय जाधव यांनी सूचक इशारा देत लवकरच झालेल्या घडामोडींवर चूप्पी तोडणार असल्याचा इशारा दिलाय. ऍड. धनंजय जाधव आणि नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे हे अत्यंत जवळचे मित्र आहेत.तसेच मागील विधानसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर शहरातून काँग्रेसच्या वतीने जेव्हा सत्यजित तांबे उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी उभे असताना संपूर्ण शहरामधून ऍडव्होकेट धनंजय जाधव यांनी खुलेआम सत्यजित तांबे यांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका घेतली होती त्यावेळी काँग्रेसचे मोठमोठे पदाधिकारी या निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले होते मात्र शेवटपर्यंत धनंजय जाधव यांनी नगर शहरातून काँग्रेससाठी आणि सत्यजित तांबे यांच्यासाठी मोठा संघर्ष केल्याचं पाहायला मिळालं होतं.

नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर या निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून काँग्रेसचे सत्यजित तांबे तर भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर मधील युवा नेते धनंजय जाधव आणि नाशिक येथील धनराज विसपुते यांचे अर्ज भरले गेले. मात्र भारतीय जनता पार्टीने कोणत्याही उमेदवाराला पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर न केल्याने भारतीय जनता पार्टी मधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून नेमका हा निर्णय कशाप्रकारे घेतला गेला याबाबत अध्यापही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

काँग्रेस मधून सुजय विखे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केलेले ऍड. धनंजय जाधव हे खासदार सुजय विखे पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून समजले जातात आणि त्यांनी भाजपकडून उमेदवारी मागितल्यानंतर स्थानिक पातळीवर त्यांना थोडाफार विरोध झालाही होता. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जाधव यांनी नाशिक येथे जाऊन अर्जही दाखल केला त्यांनी दाखल केलेल्या दोन अर्जंपैकी एक अर्ज अपक्ष तर एक अर्ज भारतीय जनता पार्टीतर्फे दाखल केला गेला आहे. मात्र भारतीय जनता पार्टीने त्यांना पक्षाचे एबी फॉर्म न दिल्याने भारतीय जनता पार्टीचा कोणताही उमेदवार या निवडणुकीत उभा राहणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता ऍड. धनंजय जाधव ही नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास टाकून काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या ऍड. धनंजय जाधव यांची या निवडणुकीच्या निमित्ताने चांगलीच कुचुंबना झाली आहे. उमेदवारीसाठी भाजपकडून प्रयत्न केल्यानंतरही सकारात्मक विचार न होता भाजपने या निवडणुकीत वेगळा डाव आखला होता तर याबाब पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यासंबंधी सुचित करणे गरजेचे होते विनाकारण एखाद्या नेत्याची कुचुंबना करून ऐन वेळेस यु टर्न मारल्यामुळे भाजपमध्ये येणाऱ्या नवीन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वेगळा संदेश जाऊ शकतो आता धनंजय जाधव याबाबत काय भूमिका घेतात याकडे त्यांच्या समर्थकांची लक्ष लागू आहे.

या गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व घडामोडींबाबत खासदार सुजय विखे पाटील यांनी कोणतीही भूमिका न मांडल्यामुळे मोठे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाला आहे कारण एकीकडे थोरात विखे हा संघर्ष अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्राला नवीन नाही मात्र राजकारणात कोणी कोणाचा मित्र अथवा शत्रू कायमचा नसतो हे पुन्हा एकदा नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील घडामोडींमुळे समोर आले आहे मात्र सर्वात मोठी गोची होती ती सर्वसामान्य कार्यकर्त्याची.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular