अहिल्यानगर दिनांक 30 डिसेंबर
अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आले असून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मुदतीचा शेवटचा दिवस असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या समर्थकांसह मोठी गर्दी केली आहे.

महायुती मधून शिवसेना पक्ष बाहेर पडल्यामुळे आता शिवसेनेसमोर चार जणांचा पॅनल उभा करण्यासाठी मोठी कसरत असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांना रात्री पासूनच फोनवरून संपर्क सुरू आहे.
तर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये धक्का तंत्र सुरू असून केडगाव मधील शिवसेनेचे दोन उमेदवार भाजपमध्ये गेल्यानंतर आज राष्ट्रवादीमध्ये माजी महापौर भगवान फूलसौंदर यांची यांच्या पत्नी सुनीता भगवान फुलसौंदर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राजकारणातली हे धक्के सुरू आहेत. प्रभाग क्रमांक 14 मध्ये आता गणेश भोसले , मीनाताई चोपडा, प्रकाश बागानगरे आणि सुनीता फूलसौंदर असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनल राहील.