नाशिक दि.१६ जानेवारी
नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. भाजपा कडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेले ऍड. धनंजय जाधव यांनी अर्ज मागे घेतला आहे.त्यामुळे भाजपा आता धनराज विसपुते यांच्या बाबत काय निर्णय घेतात या कडे लक्ष लागून आहे अर्ज माघारी घेण्यासाठी आता काही मिनिटांचा अवकाश आहे.
तर अजून एक नाट्यमय घडामोड घडली असून शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्या आहेत. त्यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. अशातच अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्या आहेत. त्यांच्याशी कुणाचाही संपर्क होत नाही. पाटील या अचानक गायब झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.