Homeराजकारणनगर शहर विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मिळावा.. उद्धव बाळासाहेब ठाकरे...

नगर शहर विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मिळावा.. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एकमुखी ठराव.. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली मागणी …

advertisement

अहमदनगर दि.२८ जून
अहमदनगर शहर विधानसभेची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मिळावी असा एकमुखी ठराव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आला असून शिवसेनेचे विधानसभेचे संपर्कप्रमुख निलेश घोगरे यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली असून या बैठकीत एकमुखी ठराव करण्यात आला आहे. अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी दिली आहे शिवसेनेमध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत मात्र उमेदवारी ठरवण्याचा अधिकार हा मातोश्रीला असल्यामुळे त्यांनी दिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करू असंही शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर शहर विधानसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळावी असा ठराव करण्यात आला असून याबाबत शिवालय येथे एक बैठक घेण्यात आली या बैठकीतील नगर शहर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी अशी आग्रही भूमिका आता सर्वच पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी घेतली आहे.

शिवसेनेत फूट पडली आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक फेरबदल झाले मात्र अहमदनगर शहरातील बोटावर मोजणे इतकेच पदाधिकारी आणि नगरसेवक शिंदे गटाबरोबर केले होते त्यामुळे अहमदनगर शहरातील शिवसेनेतील नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच असल्याचे दिसून आले होते. अहमदनगर महानगरपालिकेतही शिवसेनेची सत्ता होती त्यामुळे अहमदनगर शहराची जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळावी अशी आग्रही मागणी आता समोर आली असून गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर शहर विधानसभा शिवसेनेचे माजी आमदार स्व.अनिल राठोड यांनी हा पंचवीस वर्ष किल्ला अबाधित ठेवला होता मात्र गेल्या दोन निवडणुकीत शिवसेनेचा पराभव काही थोड्या मतांनी झाल्यामुळे अजूनही शिवसेनेला मानणारा मतदार वर्ग शहरात असल्यामुळे ही जागा शिवसेनाच मिळावी अशी आग्रही मागणी आता समोर आली आहे.

अहमदनगर शहरातील शिवसेनेचे शिवालय या कार्यालयात शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, संजय शेंडगे, गिरीश जाधव, भगवान फुलसुंदर, दत्ता कावरे, गणेश कवडे, दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे, यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या मानाने शिवसेनेची ताकद ही नगर शहरात जास्त असल्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी असा ठराव आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे देण्यात आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular