Homeराजकारणसमस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने महापालिका समोर फटाके फोडून आनंद व्यक्त करणाऱ्या व्यक्तींचा...

समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने महापालिका समोर फटाके फोडून आनंद व्यक्त करणाऱ्या व्यक्तींचा निषेध जातीय मानसिकतेतून असुरी आनंद साजरा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी

advertisement

अहमदनगर दि.२८ जून

अहमदनगर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या वर लाचलुचपत विभागाने लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा हा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.मात्र सकाळ पासून महापालिकेत अनेक अफवांचे पीक आले होते तर सोशल मीडियावर अनेकांनी तोंडसुख घेतले होते तर सायंकाळी महापालिका कार्यालया समोर फटाकडे वाजवले मात्र यात मागासवर्गीय बौद्ध अधिकारी आयुक्त जावळे यांचे नाव समोर आले असल्याने काही जातीवादी प्रवृत्तीनी महापालिकेबाहेर फटाके फोडले तर कोणी पेढे वाटले, काहींनी पत्रकार परिषद घेऊन आनंद व्यक्त केला, तर काहींनी सोशल मीडियावर आदळ आपट केली हा असुरी आनंद शहरातील काही विशिष्ट महाभागांनी साजरा केला, ज्यांना मागासवर्गीय समाज कायम खटकत आलेला आहे.असा आरोप आज पत्रकार परिषदेत आंबेडकरी समजाच्या वतीने करण्यात आला.

आयुक्त त्यात दोषी आहेत की नाही हा न्यायप्रविष्ट भाग राहिला..पण यानुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित होताहेत ते असे की, एखादा अधिकाऱ्यावर नगर शहरात लागणारा हा पहिलाच ट्रेप होता का..? याआधी ही महापालिकेत अनेकांवर कारवाई झाल्या… पण यंदाचा ट्रॅप मागासवर्गीय बौद्ध अधिकाऱ्यावर लावला असल्याकारणाने
एका बौद्ध अधिकाऱ्याने अनेक वर्षापासून रखडत असलेला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पूर्णाकृती पुतळाचे काम मार्गी लावले, शहरात अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांचे काम मार्गी लावणारे मनपा आयुक्त जावळेच होते, आपल्या कामाच्या बाबतीत कुठलीही हय गय न करणारा डेशिंग अधिकारी म्हणून त्यांची शहरात ओळख आहे. पण अधिकारी मागासवर्गीय अन त्यातल्या त्यात बौद्ध असल्याने त्यांच्यासमोर झुकणे यांना मान्य नव्हते यासाठीचा हा ट्रॅप लावण्यात आला असल्याचा आरोप या वेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला.

पंकज जावळे यांच्यावर कारवाई झाली म्हणूनच हा असुरी आनंद साजरा करणाऱ्यात आला असे आमचे स्पष्ट मत आहे. सदरील घटनेमुळे शहरातील तमाम आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवल्या असून
अन त्याच अनुषंगाने शनिवारी जिल्हा पोलीस
अधीक्षक यांची भेट घेऊन संबंधित फटाकडे वाजवणारे सोशल मीडियावर पोस्ट करणारे यांच्यावर ऐंट्रोसिटी ऐक्ट प्रमाणे कारवाई करण्याची मागणी
समस्त आंबेडकरी समाज करणार आहे. या पत्रकार परिषदेला सिध्दार्थ आढाव,सुशांत म्हस्के,पवन भिंगारदिव,सुनिल क्षेत्रे,बंडु आव्हाड,प्रतिक बारसे
सुमेध गायकवाड,संजय कांबळे,कोशल गायकवाड
विशाल भिंगारदिव,अजय साळवे,संजय जगताप,,संदिप वाघचौरे,संजय जगताप,विशाल गायकवाड,पोपट जाधव,विजय गायकवाड,जय कदम,विनित पाडळे
गणेश गायकवाड आदी उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular