अहमदनगर दिनांक 9 जून
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय झाला होता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील हे महायुतीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले होते तर समोर कोण येईल याचे चर्चा सुरू असताना आमदारकीचा राजीनामा देऊन निलेश लंके यांनी लोकसभेच्या मैदानात डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासमोर शड्डू ठोकला होता. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची झाली या चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे 28 हजारच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.
या विजयात जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे हातभार लागलेले आहेत. त्याचप्रमाणे जेऊर जिल्हा परिषद गटामधील युवा नेते संदीप कर्डिले यांनीही जेऊर जिल्हा परिषद गटामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने बलाढ्य अशा महायुतीच्या बालेकिल्ल्यात लढा देत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना मतांद्वारे आघाडी मिळवून दिली आहे.एकीकडे भाजपा, शिंदे गट शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा मातब्बर पक्षांसह मातब्बर नेते आणि कार्यकर्ते असताना महाविकास आघाडीचा किल्ला युवा नेते संदीप कर्डिले यांनी लढवत जेऊर गटामध्ये निलेश लंके यांना निर्णायक आघाडी दिली.
ज्या ठिकाणी भाजपचा बालेकिल्ला म्हणून जेऊर गट नओळखला जात होता त्याच ठिकाणी निलेश लंके यांना बरोबरीने मत मिळाली तसेच नगर तालुक्यात लंके यांचा करिष्मा चालला याचाच अर्थ या ठिकाणी महाविकास आघाडीचे युवा नेते संदीप कर्डिले यांचा करिष्मा चालला पुढील काळातही महाविकास आघाडीचाच उमेदवार या गटातून जिल्हा परिषदे वर जाणार तसेच या परिसरातील ग्रामपंचायत आणि इतर स्थानिक संस्था या महाविकास आघाडीच आपल्या ताब्यात घेतील असा विश्वासही आता युवा नेते संदीप कर्डिले यांनी व्यक्त केला आहे.