HomeUncategorizedज्याच्या नावातच जय....तो धनंजय राजकीय सामजिक कार्यात सदिव्य अग्रेसर असणारे धनंजय कृष्णा...

ज्याच्या नावातच जय….तो धनंजय राजकीय सामजिक कार्यात सदिव्य अग्रेसर असणारे धनंजय कृष्णा जाधव…

advertisement

अहमदनगर दिनांक 10 जून
अहमदनगर शहराच्या राजकारणात आपली वेगळी छबी सोडनारे. साधी राहणी, नम्र आणि मवाळ भाषा पण कणखर बाणा आणि सामान्य माणसाशी जोडलेली नाळ यामुळे केवळ जनतेच्या प्रेमाच्या जोरावर वडिलांचा समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन जाणारा श्रावण बाळ म्हणजेच अहमदनगर शहरातील राजकीय पलटावर अत्यंत कमी वेळात चमकणारा तारा म्हणजेच धनंजय जाधव.

लहानपणापासून घरात राजकीय वातावरण त्याचबरोबर राजकीय वातावरणाबरोबर सामाजिक आणि सतत दुसऱ्यांना मदत करण्याची भावना यामुळे लहानपणापासूनच बाळकडू वडील कृष्णा जाधव यांच्याकडून मिळाले होते. फक्त राजकारण नाही तर व्यवसाय ही महत्त्वाचा हेही वडिलांकडूनच शिकल्यानंतर तरुणपणी काँग्रेस पक्षामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या जवळील नेतृत्व म्हणून ओळख झाली.

नाही नाही म्हणता सर्वसाधारण जनतेच्या मनातील एक विश्वासाचा स्थान निर्माण करण्यात धनंजय जाधव यांना यश आलं लहानपणापासून वास्तव्याच्या ठिकाणी असणाऱ्या तोफखाना भागात धनंजय जाधव यांनी आपल्या कामाचा ठसा उमटत वडिलांच्या पायावर पाय ठेवत सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा तरुण म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. कुणी भैय्या कुणी भाऊ कोणी काका कोणी दादा असा प्रत्येक सर्वसामान्य घरातील नागरिकांचा हा पाठीराखा झाला.
साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना कुटुंबांना नेहमीच मदत मिळत असते सर्व सरकारी योजनांची माहिती आणि त्या कशा मिळवाव्यात यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था त्यांनी निर्माण केली आहे. गरजू व्यक्तींना दवाखान्यापासून ते घरातील प्रत्येक गोष्टींची गरज भागवणारा युवक म्हणून धनंजय जाधव यांची ओळख निर्माण झाली आहे.

राजकारणाबरोबरच व्यवसाय सुरू ठेवायचा हा वडिलांचा कानमंत्र धनंजय जाधव यांनी तंतोतंत पालन केला आणि राजकारणाबरोबरच हॉटेल व्यवसायात त्यांनी उत्तुंग भरारी घेतली असून नगरी व्हिलेज या हॉटेलच्या माध्यमातून अहमदनगरकरांच्या जिभेवरची चव ओळखत हॉटेल व्यवसायात एक वेगळं नाव कमावले असून खवय्यांच्या मनात नगरी व्हिलेज हे नाव करून ठेवले आहे.

वडील कृष्णा जाधव यांच्यानंतर स्वतः नगरसेवक त्यानंतर पत्नीलाही नगरसेवक करून त्यांनी जनतेचा विश्वास मिळवत सामाजिक काम सुरू ठेवले आहे. काँग्रेस मधून मध्यंतरी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र समाजसेवेचे अहोरात्र काम सुरूच ठेवलं असून पक्षा व्यतिरिक्त ते अहमदनगर मधील सर्वच राजकीय पक्षांमध्ये मित्रत्व जपत असतात.

राजकारण म्हटले की चढ उतार आणि आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात मात्र धनंजय जाधव नेहमीच समाजकारण डोळ्यासमोर ठेवून कार्य करत असल्यामुळे ते नेहमीच चर्चेचा विषय राहिले. महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामांची गंगा आपल्या परिसरात आणि त्यांच्या प्रभागामध्ये आणली होती. त्यामुळे आज जरी ते नगरसेवक नसले तरी त्यांच्याकडे सामान्य माणूस रोजच काम घेऊन येतो हीच त्यांनी केलेल्या मागील कामाची ओळख निर्माण झाली आहे.

आज धनंजय जाधव यांचा वाढदिवस साजरा होत असतानाही त्यांच्या समाजकारणाची ओढ दिसून आली. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी सर्व रोग निदान शिबिर आयोजित करून आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो याची प्रचिती दाखवून दिली. सदैव नागरिकांच्या समस्येसाठी झगडणारा युवा नेता धनंजय जाधव अशी ओळख अहमदनगर शहरात झाली आहे. पद असो किंवा नसो मात्र कामामुळे आपली ओळख कशी निर्माण करावी हेच धनंजय जाधव यांच्याकडे पाहिल्यानंतर समजून येतं.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular