अहमदनगर दि.८ जून
उतावळा नवरा गुढघ्याला बाशिंग म्हणजे कोणत्याही गोष्टीची जास्त घाही असणे. गडबड असणे. याचा अर्थ असा होतो की माणूस ऊतावळेपणात डोक्याने विचार करत नाही आणि बाशिंग डोक्यावर बांधतात आणि जर बाशिंग गुडघ्यांवर बांधल तर तुमचे डोके कुठे आहे हे कळते. लग्नाच्या वेळी नवरदेवाच्या कपाळावर कागदी अगर बेगडी नक्षीकाम केलेले बाशिंग बांधतात.
असाच काहीच प्रकार सध्या ठिकठिकाणी दिसून येत आहे लोकसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि इच्छुक उमेदवार आपणच कसे आमदार होणार याबाबत वल्गना करण्यास लागले असून लोकसभेमध्ये विजयी उमेदवाराला अथवा पराभूत उमेदवाराला आपण कसे मताधिक्य मिळवून दिले याच्या चर्चा आता इच्छुक उमेदवाराकडून होऊ लागल्या आहेत. तसे पाहिले तर लोकसभेच्या आडूनच अनेक जणांनी विधानसभेची निवडणूक असल्यासारखंच प्रचार केला आहे. लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करता करतात आपला प्रचार कसा होईल याची काळजी प्रत्येक इच्छुक उमेदवाराने लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात घेतली होती आणि यावरून अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांमध्येच खडाजंगी झाल्या होत्या.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला होता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आरपीआय आठवले गट रासपा आणि प्रमुख म्हणजे भाजप यांचा समावेश होता तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांचा प्रामुख्याने समावेश होता आणि या सर्व प्रमुख पक्षांमधील अनेक नेते आणि कार्यकर्ते हे आता विधानसभेसाठी इच्छुक असून सर्वजण आपणच कसे विधानसभेसाठी योग्य आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न सोशल मीडियावरून देत आहेत. यामुळे आत्ताच डझनभरच्या वर इच्छुक विधानसभेसाठी तयार झाले असून निवडणूक जवळ आल्यावर किती इच्छुक लोक तयार होतील हे सांगता येणार नाही मात्र आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात यावरच या सर्वांचं भवितव्य अवलंबून आहे.असे असताना जे महायुतीचे कार्यकर्ते आणि नेते कालपर्यंत एकत्र होते तेच आता एकमेकांची लायकी काय आहे याबाबत चर्चा करू लागले आहेत. कोणी किती काम केलं कोण कुठे विकले गेले याबाबतही आता सोशल मीडियातून चांगलीच चर्चा होऊ लागली आहे त्यामुळे नगरकरांना एक नवीन चर्चा ऐकण्यास आणि वाचण्यास मिळण्यास लागल्यामुळे नगरकरांचे मनोरंजन होऊ लागले आहे.
अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात झालेली लढत ही चुरशीची लढत झाली अवघ्या 28 हजार मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार लोकसभेमध्ये निवडून आले आहे त्यामुळे कोणाची ताकद किती आणि कुठे याची आकडेवारी समोर आली असली तरी विधानसभेला वेगळे गणित असते स्थानिक प्रश्न तेथील राजकीय गणित आणि मतदारांची साथ त्यामुळे लोकसभेच्या मतांच्या आकड्यांवर जाऊन जर आपणच पुढचा आमदार असल्यासारखं कोणी वागत असले तर त्याला उतावळा नवरा गुढघ्याला बाशिंग ही म्हण योग्यपणे लागेल.
लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार यांच्यासमोर आता पुढील काळात विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलीच डोकेदुखी होणार आहे. कारण प्रत्येक तालुक्यात डझनभर उमेदवार इच्छुक असल्यामुळे नेमकी काय भूमिका घ्यायची आणि कोणाला उभे करायचे यासाठी मोठे कष्ट पडणार आहेत आणि यातून नाराजगी वाढणार तर आहेच त्यामुळे येणाऱ्या काळात आजी-माजी खासदारांना विधानसभेची डोकेदुखी वाढून यातून पुन्हा एकदा नाराजी नाट्याला सामोरे जावे लागणार आहे.