Homeजिल्हामहावितरण अधिकारी म्हणतात आम्हाला शेतकरी आत्महत्या माहीतच नव्हती.. आता चेंडू आपर पोलीस...

महावितरण अधिकारी म्हणतात आम्हाला शेतकरी आत्महत्या माहीतच नव्हती.. आता चेंडू आपर पोलीस अधिक्षकांकडे

advertisement

अहमदनगर दि.२९ नोव्हेंबर

नगर तालुक्यातील अकोळनेर येथे शेतकरी पोपट जाधव यांनी आज सकाळी आपल्या शेतामध्ये गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली वीज वितरण कंपनीने गेल्या आठ दिवसापासून वीज खंडित केल्याने पोपट जाधव यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर नगर तालुक्यात एकच संतापाची लाट उसळली होती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कारले यांनी जोपर्यंत महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्यानंतर जवळपास 10  तासानंतरही या प्रकरणावर जिल्हाधिकारी कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी मापारी यांच्यासमोर चर्चा सुरू होती. यावेळी महावितरनचे कार्यकारी अभियंता ठाकूर यांना चर्चेसाठी बोलवण्यात आल्यानंतर त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की ही घटना घडली हे आम्हाला फार उशिरा कळले विशेष म्हणजे सकाळी घटना घडल्यानंतर सर्व सोशल मीडियावर आणि सर्व टीव्ही चॅनल्सवर या घटनेची बातमी पसरली होती मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना दुपारपर्यंत या घटनेची माहिती नव्हती  याच आश्चर्य सर्वांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार जिल्हा परिषदचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ संदेश कार्ले यांनी ठिय्या मांडून महावितरण च्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे या विषयावर चर्चा सुरू होती मात्र अखेर येथेही तोडगा न निघाल्याने आता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया मध्ये जाऊन अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या दालनात पुन्हा बैठक सुरू आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular