अहमदनगर दि.३० जून
अहमदनगर शहरा मध्ये जवळपास बारा वर्षापासून फेज टू चे काम पूर्ण झालेले नाही त्यामुळे दोनशे कोटी रुपयांच्या निधीचे काम हे आज पर्यंत पूर्ण झाले नसल्यामुळे शहरात पाणीपुरवठा सुरळीत होताना दिसत नाही त्यातच काम करणाऱ्या ठेकेदाराने अंतर्गत जलवाहिन्या एच डी पी ई पाईप जलवाहिन्यांचे काम करत असताना एचडी पी ई पाईप हे एक फुटाच्या आतच जमिनीत गाडल्या गेले टाकल्या चे दिसून येत आहे त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर शहरात उदभवू शकतो नियमानुसार एक मीटरची खोली असणे हे गरजेचे असताना देखील फोटोमध्ये हे पाईप हे एक फूट सुद्धा खोदकाम न करता टाकलेले दिसत आहेत .
हा सर्व प्रकार आनंद धाम रस्त्यावरीलरस्त्यांचे काम सुरू असल्यामुळें उघडकीस आला आहे हा संपूर्ण प्रकार मनसेचे नितीन भुतारे यांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांच्या निदर्शनास आणून दिला व ही सर्व परिस्थिती दाखविली 200 कोटीची फेज टू ची योजना खर्च करून जर शहरात पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काम होत नसेल होणार नसेल तर अशा निकृष्ट कामामुळे भविष्यात नागरिकांना पाणीपुरवठा होणार नाही कुठल्याही प्रकारची लेवल ह्या पाईपलाईन टाकताना दिसून येत नाही.सर्व पाईप हे चढ उतार पध्दतीने टाकल्याचे येथे दिसुन येते फेज टु अंतर्गत जलवाहिनी चे पाईप लाईन टाकण्याचे काम योग्य पद्धतीने झाल्याचे दिसून येत नाही त्यामुळे आपण आमच्या बरोबर संपूर्ण शहराचा सर्वे करून संपूर्ण शहरात फेस टू चे अंतर्गत जलवाहिनी एचडीपीई पाईप हे एक मीटर खोलीपर्यंत गाडण्यात टाकण्यात आले की नाही याची आपण शहानिशा करावी आमच्या सोबत आपण सर्वे करावा जिथे जिथे हे पाईप नियमानुसार एक मीटर अंतर जमीनीत गाडले गेले नसतील तर ते पुन्हा त्या लाईनचे काम करण्यात यावे व एक मीटर खोली घेउन टाकण्यात यावे अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन भुतारे यांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांना केली आहे.
फेज टू च्या लाईन माध्यमातून जनतेला भविष्यात सुरळीत पाणीपुरवठा होणार याची दक्षता घेऊनआपण काळजी घ्यावी अन्यथा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी असा इशारा देखील मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला आहे.