दिल्ली दि.३० जून
महागाईने आधीच खिसा रिकामा होत असताना आता दरवाढीची झळ आणखी तीव्र होणार आहे. जीएसटी परिषदेने काही वस्तूंवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेने काही वस्तूंवर असलेली कर सवलत पुन्हा मागे घेतली आहे. तर, काही वस्तूंवरील जीएसटी दरात वाढ केली आहे. ही नवीन करवाढ 18 जुलैपासून लागू होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परिषदेच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, कॅसिनो, ऑनलाइन गेमिंग आणि घोड शर्यतीवरील कराचा प्रस्ताव पुनर्विचार करण्यासाठी मंत्रिगटाकडे पाठवण्यात आला आहे. गोव्याच्या अर्थमंत्र्यांनी कॅसिनोवरील जीएसटी दराबाबत चर्चा करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे या तीन गोष्टींवरील जीएसटीवर पुनर्विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आत्तापर्यंत फ़क्त ब्रँडेड वस्तूसह ईतर पैकेज वस्तूवर GST लागु होता पण आता अत्यावश्यक असलेल्या फ्री पैकेज म्हणजे ( सील बंद नसलेले पदार्थ ) खाण्यापिण्याच्या वस्तूवर देखील GST लागु करण्यात आला आहे.18 जुलै पासुन नवीन खाण्यापिण्याच्या पदार्थांवर GST लागु होईल त्यामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेले वस्तू हे
1) दही, लस्सी, पापड, दुध, बटर सहित सर्व ब्रँडेड नसलेले फ्री पैकेज फूड यावर 5% GST राहणार आहे
2) तसेच बँकेच्या चेक बुक साठी 18% GST
3) 1 हजारच्या वर असलेल्या हॉटेलच्या रूम साठी 12% GST
4) 5 हजाराच्या वर असलेल्या हॉस्पिटल बेड साठी 5% GST
5) LED बल्ब , ट्यूब लाईट , लैम्प साठी पहिले 12% होतं आता 18% GST
6) स्टील घरगुती साहित्य उदा – छूरी, चमचा पहिले 12% होता आता 18% GST
7) कोणतेही मोटर पंप, पाईप आणी मशीन पहिले 12% होता आता 18% GST होणारं आहे त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार