अहमदनगर दि.१७ जुलै
अहमदनगर शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर खुनी हल्ला करून फरार असलेल्या भाजपच्या नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्या मुसक्या पोलिसांनी अवळल्या आहेत त्याचबरोबर त्याचे साथीदार अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कु-हे, राजु फुलारी यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले असून शनिवारी रात्री सव्वा दहा ते साडे दहाच्या सुमारास एकविरा चौक या ठिकाणी किरकोळ वादातून झालेल्या भांडणात भजापा नगरसेवक स्वप्नील शिंदे याने आपल्या साथीदारासह अंकुश चत्तर यांच्यावर जीव घेणा हल्ला केला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये भानुदास सोमवंशी यांच्या फिर्यादीवरून जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तोफखाना पोलिसांसह साने गुन्हे शाखा आणि पोलीस उपाधीक्षक यांची पथके आरोपींना शोधण्यासाठी नगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्रीच रवाना झाले होते. अखेर 48 तासांमध्ये पोलिसांनी या आरोपींच्या मुस्क्या अवळल्या आहेत.
अत्यंत निर्घृणपणे आणि शांत डोक्याने या आरोपींनी अंकुश चत्तर यांच्यावर हल्ला केला होता. हल्ला करण्यासाठी आरोपींनी लोखंडी रॉड वापरले होते. तर अगदी चित्रपटाला शोभेल अशाप्रकारे हा हल्ला करण्यात आला होता या प्रकरणामधील म्होरक्या असलेला भाजपा नगरसेवक स्वप्निल शिंदे याने आपल्या साथीदारांनी अंकुश याच्यावर हल्ला केल्यानंतर गाडीतून उतरून पाहणी केली होती आणि “तो संपला का पहा रे” असा डायलॉग मारला होता. हा हल्ला नेमका कोणत्याकारणातून झाला का याचा खुलासा आता पोलीस तपासात होणार आहे.