Home शहर अखेर उड्डाणपुलावरील अपघातास कारणीभूत असलेले गतिरोधक काढले

अखेर उड्डाणपुलावरील अपघातास कारणीभूत असलेले गतिरोधक काढले

अहमदनगर दिनांक 30 नोव्हेंबर

अहमदनगर शहरातील नव्याने झालेल्या उड्डाणपुलावर रोजच अपघात होत आहे. या पुलाला सुरू होऊन एक महिना झाला नाही त्यामध्येच या पुलावर रोजच अपघातांची मालिका सुरू होती. त्याचं मुख्य कारण म्हणजे या उड्डाण पुलावर नियमात नसलेले गतिरोधक टाकण्यात आले होते. या गतिरोधकांमुळे वाहतुकीचा खोळंबा तर होतच होता त्याचबरोबर अनेक वाहनांचे अपघात होऊन त्यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातानंतर वाहतुकीची कोंडी होणे हे नित्याचेच झाले होते उद्घाटनाच्या पहिल्या दिवसानंतरच ही अपघातांची मालिका सुरूच होती. अखेर मंगळवारी लागोपाठ दोन अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि रात्री उशिरा या उड्डाण पुलावरील नियमात नसलेले गतिरोधक काढण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली. रात्री उशिरा जेसीबीच्या साह्याने उड्डाण पुलावरील गतिरोधक अखेर काढण्यात आले आहेत.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version