Home Uncategorized 32 कोटी रुपयांची लूट थांबवा प्रस्ताव विखंडीत करण्यासाठी पुन्हा सर्वसाधर बोलवा आणि...

32 कोटी रुपयांची लूट थांबवा प्रस्ताव विखंडीत करण्यासाठी पुन्हा सर्वसाधर बोलवा आणि तो प्रस्ताव विखंडीत करा.. जो नगरसेवक प्रस्तवाला पाठिंबा देईल त्यांच्या घरा समोर बोंबा बोंब आंदोलन करणार – किरण काळे

अहमदनगर दि.३० नोव्हेंबर

32 कोटी रुपये देऊन स्मशानभूमी आणि दफनभूमी प्रस्तावाला विरोध केला नाही तर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसच्या नागरसेवकांच्या दारा पासून बोंबा बोंब आंदोलन सुरू करू असा इशारा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे.

मागील आठवड्यात अहमदनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सावेडी भागातील सर्वे नंबर 261/अ/1 ही कागदावर असणारी ४ एकरची जमीन विकत घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता त्या नंतर काही नगरसेवकांनी लगेच विरोध दर्शवला होता तर काही नगरसेवकांनी मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्या कडे निवेदन देऊन विरोध दर्शविला आहे.

या प्रस्तवाला आता काँग्रेसने कडकडून विरोध केला असून हा प्रस्ताव विखंडीत करण्यासाठी पुन्हा सर्वसाधारण सभा बोलवून झालेला प्रस्ताव विखंडीत करावा अशी मागणी किरण काळे यांनी केली आहे.आणि जर या प्रस्तवाला जे नगरसेवक पाठिंबा देतील आशा पाठिंबा देणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांच्या दारात बोंबा बोंब आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

या प्रस्तावाला विरोध करण्याबरोबर नगर शाहरतील प्रत्येक प्रभागात माहिती पत्रके वाटून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल अशी भूमिका किरण काळे यांनी मांडली.

या पत्रकार परिषदेत बोलताना किरण काळे म्हणाले की नगर काही वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या वेगळ्या पक्षाच्या भूमिका समोर आल्यावसून त्या ठिकाणी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शहराच्या आमदारांनी त्याठिकाणी सांगितलं की ही जी नवीन जागा आहे ती नको जुनी जागा योग्य आहे असे मत त्यांनी मांडले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने अशी भूमिका आली आहे की हा प्रश्न महानगरपालिकेचा आहे. म्हणजे त्यांनी जबाबदारी झटकलेली आहे. आमदारांनी मांडलेली भूमिका आणि त्यांच्या नगरसेवकांनी सभागृहामध्ये घेतलेली भूमिका ही परस्परविरोधी आहे. की काँग्रेसने त्या ठिकाणी नगरकरांच्या तिजोरी वरती दिवसाढवळ्या दरोडा घालून चोऱ्या माऱ्या करणाऱ्यांच्या विरोधात यलगार पुकरल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांना प्रश्नावर जाग आली. तसेच काँग्रेस पक्षाच्या ज्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी या ठरावला विरोध करणारी भूमिका अद्याप घेतली नाही त्यांना पक्षादेश बजावलाय की आपण दोन दिवसांच्या आत लेखी पत्र मनपा प्रशासनाला देण्याचे सांगितले आहे  काँग्रेसच्या शीला दिप चव्हाण यांनी त्याठिकाणी त्याचा लिखित  विरोध नोंदवलेला आहे तसेच असिफ   सुलतान यांनी विरोध दर्शविला आहे. या व्यतिरिक्त जे चार नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांशी देखील संपर्क साधत संवाद साधला असून त्यांनी देखील अनुकूलता दर्शवली आहे. आमच्या नगरसेवकांपैकी जर कोणत्याही नगरसेवकांनी जर लेखी त्या ठिकाणी पत्र देत महापालिकेमध्ये याला विरोध केला नाही तर त्या नगरसेवकाला काँग्रेस पक्षाची येत्या एक वर्षावरती येऊ घातलेली महानगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक आहे त्यामध्ये काँग्रेस पक्ष उमेदवारी कदापिही देणार नाही आणि पंधरा दिवसांच्या आत महानगरपालिकेने विशेष महासभा पाचारण करावी त्या विशेष महासभेमध्ये त्या ठिकाणी सर्वपक्षीय सगळ्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी या ठरावाला कडाडून विरोध करावा आणि हा ठराव रद्द करावा जे नगरसेवक काँग्रेस पक्षासह अन्य पक्षाचे जे नगरसेवक या ठरावाला विरोध करणार नाहीत अशा नगरसेवकांच्या दारामध्ये  काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन बोंबाबोंब आंदोलन करतील. अशी स्पष्ट भूमिका किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version