Homeराजकारणपाच राज्यांच्या विधानसभांचा कौल कुणाला? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

पाच राज्यांच्या विधानसभांचा कौल कुणाला? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

advertisement

मुंबई – दि.३० नोव्हेंबर
पाच राज्यांच्या विधानसभांसाठी मतदान पार पडलं असून त्याच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे. विविध वृत्तवाहिन्या आणि विविध संस्थांच्या माध्यमातून एक्झिट पोल समोर आले असून
छत्तीसगडमध्ये आणि तेलंगाना मध्ये काँग्रेस आघाडीवर आहे तर मध्यप्रदेश मध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर असून राजस्थानमध्ये सुद्धा तीच परिस्थिती एक्झिट पोल च्या माध्यमातून समोर आली आहे. मिझोराम मध्ये MNF विरुद्ध काँग्रेस टक्कर राहणार आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप- छत्तीसगडमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप- मध्य प्रदेशात भाजप विरुद्ध काँग्रेस- तेलंगणात BRS विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप- मिझोराममध्ये MNF विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप

छत्तीगडमधील आकडेवारी
स्रोत- सी वोटर
एकूण जागा – 90 भाजप – 47काँग्रेस – 42 इतर – 01

मध्य प्रदेश
एकूण जागा २३० जागा भाजपा १०६-११६ काँग्रेस १११-१२१ इतर ६-००

राजस्थान
एकूण जागा १९९ जागा भाजपा १००-११० काँग्रेस ९०-१०० इतर ५ – १५

तेलंगणा
एकूण जागा ११९ जागा भाजपा ०२-०४ काँग्रेस ६३- ७९ , बीआरएस – ३१-४७ Aimim- ०५- ०७ इतर ००

मिझोरम
एकूण जागा ४० MNF – १४-१८ काँग्रेस -०८-१० ZPM – १२-१६ भाजपा -०२

कोणत्या राज्यात कोणाचे सरकार?

– राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे.- छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे.- मध्य प्रदेशात सीएम शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे- तेलंगणात सीएम केसीआर यांच्या नेतृत्वाखाली बीआरएस सरकार- मिझोराममध्ये सीएम झोरमथांगा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाठिंब्याने एमएनएफ सरकार.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular