अहमदनगर दि.१, डिसेंबर
अहमदनगर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील संतोष जाधव या कर्मचाऱ्याला अहमदनगरच्या लाच लुचपत विभागाने बावीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे अशी माहिती समोर येत असून एका गावातील सभा मंडपाचे काम झाल्यानंतर बिल काढण्यासाठी ही लाच मागितली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.