Homeशहरअहमदनगर महापालिका आरोग्य विभगातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदवी खोटी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अहमदनगर महापालिका आरोग्य विभगातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदवी खोटी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

advertisement

अहमदनगर दि .२९ नोव्हेंबर

अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदवी खोटी असल्याची तक्रार उपशहर प्रमुख तारीक आसिफ कुरेशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की अहमदनगर महानगरपालिका स्टॅफींग पॅटर्न २०१६ नुसार वैद्यकिय
आरोग्य अधिकारी या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही MDPSM आवश्यक असुन सध्या
त्या पदावरती अनिल बोरगे यांची शासनाकडुन वैद्यकिय आरोग्य अधिकारी या पदावर
पदोन्नती देण्यात आलेली आहे. परंतु अनिल बोरगे यांनी अहमदनगर महानगरपालिकेने सन
२००४ साली आवश्यक DPH या दोन वर्षाच्या पदवीसाठी परवानगी नाकारली होती. तसेच बोरगे
यांची पदवी एक वर्षाची दिसुन येते. तरी महाराष्ट्र वैद्यकिय परिषद यांनी दिलेल्या पत्रानुसार एक
वर्ष कालावधीचा कोणताही अभ्यासक्रम चालविला गेलेला नसल्याचा पुरावा देखील यावेळी देण्यात आला आहे. त्यामूळे अहमदनगर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदवी खोटी असल्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाचे संपर्क प्रमुख रंजीत परदेशी,शहरप्रमुख रोहित लोखंडे,उपशहर प्रमुख तारिक कुरैशी,किरण जव्हेरी, अभिनंदन कुरमुडे उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular