अहमदनगर दि.२३ ऑक्टोबर :
वाकोडी गावातील प्रत्येक कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्यशासनाच्या वतीने शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यामध्ये रवा,चणाडाळ,साखर,एक किलो तेल प्रत्येक कुटुंबाला देण्यात येत आहे यासाठी शिधापत्रिका धारकाला शंभर रुपये द्यावे लागणार होते मात्र बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले मित्र मंडळाच्या वतीने वाकोडी गावातील 630 कुटुंबांना प्रत्येकी शंभर रुपये आर्थिक मदत केली सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आनंदाचा शिधा वाटपाचे नियोजन करून प्रत्येक कुटुंबाला किराणा साहित्य देण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड काळामध्ये सर्वसामान्य कुटुंबाला रेशन द्वारे मोफत धान्य देण्याचे काम केले आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही वर्षाला सहा हजार रुपयांचे अनुदान दिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले काम सर्वसामान्यांना आधार देणारे आहे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करत आहे प्रत्येक कुटुंबाची दिवाळी गोड होण्यासाठी वाकोडी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असल्याचे प्रतिपादन माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी केले.

नगर तालुक्यातील वाकोडी येथे महाराष्ट्र शासनाच्या आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले सरपंच मंगल गवळी सोसायटीचे चेअरमन बच्चू मोडवे उपसरपंच आदिनाथ मोडवे संतोष खांदवे एकनाथ कराळे विशाल गागरे शारदाताई पवार शनेश्वर पवार दीपिका कराळे योगेश कर्डिले प्रल्हाद गवळी मुरलीधर मोडवे मांढरारामा पवार ज्ञानदेव गावडे हौसाबापू गवळी रामदास गाडळकर भास्कर मोडवे शिवाजी गवळी राजीव पवार भानुदास पवार बाळासाहेब लुंकड गणेश तोडमल मारुती गवळी आदी उपस्थित होते.
सोसायटीचे चेअरमन बच्चू मोडवे म्हणाले की माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली गावातील प्रत्येक कुटुंबाला शासनाच्या वतीने दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते गावातील प्रत्येक कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिधा वाटपाचे नियोजन करून मोफत किराणा किट देण्यात आले कुठल्याही नागरिकांकडून पैसे घेतले नाही तर हरिभाऊ कर्डिले मित्र मंडळाच्या वतीने प्रत्येक कुटुंबाची रक्कम अदा करण्यात आली आहे नियोजन करून दिवाळीच्या आधी किराणा साहित्याची मदत दिली जात आहे असे ते म्हणाले.