अहमदनगर दि. १८ डिसेंबर
अहमदनगर शहरात विक्रीसाठी आणलेल्या लाखो रुपयांच्या अवैध गुटख्याच्या दोन वाहनावर IG पथक वनगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकाने केली धडाकेबाज संयुक्त कारवाई करून सुमारे 17 लाख 14 हजार 512 रुपयांचा गुटखा पकडला आहे.
या घटनेबाबत हकीगत अशी की नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जे शेखर यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दी मध्ये दिल्लीगेट परिसरात असलेल्या डी एड कॉलेज समोरील पार्किंग उभा असलेल्या दोन मालवाहु टॅम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी घालण्यात आलेल्या गुटखा विक्रीसाठी आलेला आहे अशी माहिती मिळाल्याने अहमदनगर शहरात कार्यरत असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल शकील अहमद शेख यांच्यासह नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या सह पोहेकॉ बाबासाहेब फसले, पोहेकॉ सचिन जाधव, पो ना हेमंत खंडागळे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीचा ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी उभा असलेल्या अशोक लेलँड जितो आणि टाटा एसी जीप या दोन मालवाहू गाड्यांमध्ये २,९५,६८०/-रुपये हिरा पान मसाला एक्सएल पॅक १६८० पॅकेट, ६२,८३२/- रोयाल ७१७ तंबाखु एक्सएल-पॅक १४२८ पॅकेट,४,७९,१६०/- विमल पान मसाला किंग पॅक २४२० पॅकेट,१४,४००/-एम सेंटेड तंबाखु ४० पॅकेट,३७,४४०/-आरएमडी पानमसाला ४८ पॅकेट,७२,०००/- हिरा पान मसाला महापॅक ६०० पॅकेट ९०००/-रोयाल ७१७ तंबाखु महापॅक ३०० पॅकेट,४४,०००/- व्ही १ तंबाखु किंग पॅक ४४०पॅकेट असा एकूण 17 लाख 14 हजार 512 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
या प्रकरणी हरिश खेमकरण खंडोजा( वय ३६ वर्ष रा. प्रवरानगर ता राहता जि अहमदनगर) आणि दिपक पोपट यादव (वय३९ वर्ष रा. ब्राम्हणगल्ली माळीवाडा अहमदनगर) यांच्या विरोधात भादवि कलम ३२८,२७२,२७३,१८८, सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२)(iv), २७ (३)(d),२७ (३)(e), ३०(२)(a), कलम ३ (१) (zz)(i), कलम ३(१)(zz)(v) चे उल्लंघन करुन कलम ५९ अन्वये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोफखान्यावर भरोसा नाय का?
यामध्ये मोठी विशेष भाग म्हणजे हा गुन्हा घडला तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकला विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाच्या आणि नगर शहर उपविभागीय अधिकारी पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आणि हा तपास दिला गेला कोतवाली पोलिसांकडे त्यामुळे हा एक मोठा चर्चेचा विषय झाला आहे. छापा टाकल्यानंतर गुन्हा दाखल होण्याआधीच हा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र हे असे का घडले हे अद्यापही समजले नाही पण अशा प्रकारामुळे पोलिसांचे मनोधैर्य नक्कीच खच्ची होते आणि समाजामध्ये एक वेगळाच संदेश जातो गुन्हा दाखल होण्यापूर्वीच हा तपास इतर पोलीस स्टेशन कडे जातो म्हणजे वरिष्ठांना तोफखाना पोलिसांवर विश्वास नाही का? असा संदेश बाहेर पोहोचला गेला!
हा गुटखा कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माळीवाडा भागात जाणार होता मात्र त्या ठिकाणी रोडचे काम सुरू असल्याने तेथे गोडावून वर न जाता तो पार्किंग मध्ये ठेवण्यात आला होता त्यामुळे हा गुटखा पकडला गेला.
हा गुटखा पकडला गेल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या काही कर्मचाऱ्यांनीही तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती
सदरची कारवाई उप पोलीस महानिरीक्षक डॉ.बी. जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, पोलीस उप निरीक्षक समाधान सोळंके, पोहेकॉ शकिल शेख,पोहेकॉ.बाबासाहेब फसले, पोहेकॉ.सचिन जाधव, पो ना.हेमंत खंडागळे,अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री शरद पवार साहेब यांनी संयुक्तरित्या केली आहे.या गुन्हयाचा पुढील तपास हा कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संपतराव शिंदे हे करीत आहेत.