अहमदनगर दि.१८ डिसेंबर
सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात गेल्या तीन दिवसांपासून महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या रस्ता दुभाजकांपैकी एक दुभाजक आडव्या स्थितीत पडला असल्याने हा आडवा पडलेला रस्ता दुभाजक अपघाताला निमंत्रण देत आहे.गेल्या तीन दिवसांपासून हा दुभाजक या ठिकाणी पडलेला अवस्थेत असून याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही.
मात्र या दुभाजकामुळे एक दुचाकीस्वाराचा धडकून अपघात झाला या अपघातात त्याला चांगलाच मार लागला तर गाडीचे मोठे नुकसानही झाले आहे. या ठिकाणी जवळच महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी कार्यालय असून या ठिकाणी महानगरपालिकेचे सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रोजच राबता असतो.मात्र त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली कशी नाही काय ! की एखाद्याचा जीव जाईपर्यंत वाट पहावी लागेल तरच महापालिका प्रशासन हे रस्ता दुभाजक सरळ करतील असा उपरोधिक टोला या परिसरातील नागरिकांनी लगावला आहे.