अहिल्यानगर दिनांक 11 जुलै
नगर शहरातील मेडीकल रिप्रेन्झेटीव्ह असलेले पियुष प्रफुल लोढा यांना त्यांच्याच मामेभाऊ असलेला विनायक नगर येथील महेश सुमतीलाल संचेती व त्याच्या पत्नीने प्लॉटच्या घेण्याच्या बहाण्याने आर्थिक देवाणघेवाणीत फसवल्याची तक्रार कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. पोलिसांनी पियुष लोढा यांच्या तक्रारीवरून महेश संचेती व त्याच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत थोडक्यात हाकिकत अशी की प्रफुल्ल लोढा यांचे मामेभाऊ असलेले महेश सुमतीलाल संचेती आणि त्याच्या पत्नीने लोढा यांच्या घरी येऊन आम्हाला आर्थिक अडचण आहे. त्यामुळे केडगाव येथील सर्वे नंबर 392/2 पैकी प्लॉट नंबर 7 हा आम्ही विक्रीसाठी काढला असून तो तुम्हाला घ्यायचा असेल तर आपण व्यवहार करू शकतो असे सांगून प्लॉटची सर्व कागदपत्रे दाखवली होती. देवानघेवाणी मध्ये प्लॉटची किंमत नऊ लाख रुपये ठरवण्यात आली होती. त्यासाठी एका वकिलाकडे जाऊन दोघांनीही नोटरी करून घेतली.त्यावेळी लोढा यांनी महेश सुमतीलाल संचेती यांना सुरुवातीला 1 लाख रुपये चेकव्दारे आणि 5 लाख रुपये रोख स्वरुपात असे एकुण 6 लाख रुपये दिले होते. तसेच महेश व अंजुश्री यांनी तीन महिन्यात् प्लॉटची खरेदी देण्याचे सांगितले होते. त्यानंतर प्रफुल्ल लोढा यांनी महेश सुमतीलाल संचेती व अजुश्री महेश संचेती यांना वारंवार सदर प्लॉटची खरेदी करुन देण्यासाठी विनंती करूनही दोघेही पती-पत्नी खरेदी देण्यास टाळाटाळ करू लागले त्यावेळी संशय बाळगल्याने प्रफुल्ल लोढा यांनी सदर प्लॉटची माहिती घेतली असता. अंजुश्री महेश संचेती हिने सदरचा प्लॉट हा दिनांक 03/09/2021 रोजी प्रितम हिरालाल पटया यांना विक्री केली असल्याची धक्कादायक माहिती लोढा यांच्या समोर आली.
त्यानंतर प्रफुल्ल लोढा यांना आपली फसवणूक झाली असल्याचे समजल्याने त्यांनी वारंवार विनंती करूनही महेश व अंजुश्री संचेती यांनी पैसे न दिल्याने अखेर प्रफुल लोढा यांनी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन संचेती पती-पत्नी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
यात अजून एक धक्कादायक बाब म्हणजे याच प्लॉटची 2019 मध्ये सुद्धा बनावट दस्तऐवज करून विक्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.पाच मे 2019 रोजी अंजुश्री संचेती हिने बनावट दस्ताऐवज करून मंदा शंकर घुगे यांच्या जागी अनोळखी महिला उभी करून सदर प्लॉटची खरेदी घेवुन मंदा शंकर घुगे यांची फसवणुक केल्याने अंजुश्री संचेती व त्यांच्या साथीदारांविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 763/2022 भा.द.वि कलम 419, 420, 465, 467, 468, 471, 201, 34 प्रमाणे दिनांक 30/09/2022 रोजी गुन्हा दाखल आहे.
तोच प्लॉट पुन्हा प्रफुल्ल लोढा यांना दाखवून विक्री करण्याचा घाट संचेती दांपत्याने केला होता. त्यामुळे प्लॉट खरेदी करताना संपूर्ण कागदपत्रे तपासूनच प्लॉट खरेदी करावा अन्यथा जन्मभर कष्टाने आणि मेहनतीने जमा केलेली पुंजी असे लबाड लोक लुबाडून नेतात.
नगरमध्ये अशीच एक गॅंग असून “बिल्डर” हा त्याचा मोहरक्या आहे. पुणे आणि नेवासा या ठिकाणी बनावट कागदपत्रे तयार करून अशीच प्लॉट धारकांची फसवणूक करण्याचा त्याचा हातखंडा असून. सर्व कागदपत्रे बनावट तयार करून तो मात्र नामनिराळा राहत असतो. अशा फसवणाऱ्या लोकांपासून सुद्धा सावध राहणे सुद्धा गरजेचे आहे.