मुंबई दिनांक 13 जुलै
: ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होती. मात्र, काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता राज्यसभेत राष्ट्रपती कोट्यातून त्यांची खासदारपदी निवड झाली आहे.
सरकारी 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या केसेस मध्य वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले होते. गुलशन कुमार हत्याकांड, प्रमोद महाजन हत्या, 2008 मध्ये मुंबईवर झालेला हल्ला, कोपर्डी बलात्कार या हायप्रोफाईल केसमध्ये त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील सरकारी विशेष सरकरी वकील म्हणून ते काम पाहत आहेत.
एस.ओ. 3196 (ई). भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ८० च्या उपकलम (१) च्या खंड (३) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपती याद्वारे नामनिर्देशित सदस्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी राज्यसभेत खालील सदस्यांची नियुक्ती करतात:-
(i) श्री उज्ज्वल देवराव निकम
(ii) श्री एस. सदानंदन मास्टर
(iii) श्री हर्षवर्धन श्रृंगला
(iv) डॉ. मीनाक्षी जैन